26.7 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeमहाराष्ट्रउमराणीत ग्रामपंचायत सदस्याचा खून

उमराणीत ग्रामपंचायत सदस्याचा खून

जत तालुक्यात आठवड्यातील तिसरी घटना

जत : जत तालुक्यातील उमराणी येथील ग्रामपंचायत सदस्य अमर कांबळे यांचा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अंतर्गत वादातून खून झाल्याची घटना घडली. आज (बुधवार) सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

आठ दिवसांपूर्वी जत येथील एका युवकाचा भरदिवसा गजबजलेल्या चौकात कौटुंबिक वादातून तलवार हल्ला करून खून करण्यात आला होता. तसेच सोमवारी दुपारी जत येथील एका महाविद्यालयीन युवतीचा प्रेमप्रकरणातून गळा दाबून खून केल्याची घटना ताजी असतानाच आज उमराणी (ता. जत) येथील ग्रामपंचायत सदस्यांचा अंतर्गत वादातून रात्री खून झाला. त्यामुळे जत तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उमराणी ते सिंदूर रस्त्यावर ही घटना घडली आहे. पहिल्यांदा मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन गटांत भांडणे होऊन वादावादी झाली. पुन्हा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास जाब विचारण्यासाठी गेला असता धक्काबुक्कीत डांबरी रस्त्यावर पडून डोक्याला मार लागून जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शव विच्छेदन करून बुधवारी सकाळी त्यांच्यावर अन्त्यसंस्कारही करण्यात आले. जत पोलिस आरोपींचा तपास करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR