28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रऊसतोडणी कामगारांचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, १० जखमी

ऊसतोडणी कामगारांचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, १० जखमी

सांगली : प्रतिनिधी
ऊसतोडणीचे काम संपवून घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर पाठीमागून ट्रकने दिलेल्या धडकेत तालुक्यातील ऊसतोडणी मजुरासह चौघांचा मृत्यू झाला. तर तब्बल १० जण जखमी झाले आहेत. मृतांतील तिघे चिखलगीचे तर एक जण शिरनांदगीचा आहे.

सदरची घटना नागपूर-रत्नागिरी महामार्गावर नागज फाट्याजवळ मध्यरात्री दोनच्या दरम्यान घडली या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात रोजगाराचे साधन नसल्यामुळे लोकांना रोजगारासाठी ऊसतोडणीचा पर्याय निवडावा लागतो त्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी जावे लागते.

येथील काही ऊसतोड मजूर ऊसतोडणीसाठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ या ठिकाणी गेले होते. यंदाचा गळीत हंगाम संपवून गावाकडे परतत असताना मध्यरात्री रात्री दोन वाजता ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभा केला होता. पाठीमागून आलेल्या आंध्र प्रदेशातील ट्रकमुळे हा अपघात झाला.

मृतांमध्ये शालन दत्तात्रय खांडेकर (वय ३०, रा.शिरनांदगी), जगमा तम्मा हेगडे (वय ३५), दादा आप्पा ऐवळे (वय १७), निलाबाई परशुराम ऐवळे (वय ३, रा. चिक्कलगी) यांचा जागीच मृत्यू झाला आणि ११ जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी कवठेमहांकाळ व मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR