31.7 C
Latur
Monday, March 10, 2025
Homeमहाराष्ट्रऊसाच्या ट्रकखाली चिरडून ६ मजूर ठार; ११ जण अडकले

ऊसाच्या ट्रकखाली चिरडून ६ मजूर ठार; ११ जण अडकले

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
छ. संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील पिशोर खांडी येथे ऊसाच्या ट्रकला अपघात झाला असून, या दुर्घटनेत ११ कामगार ट्रकखाली अडकले, तर ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यान, उसाच्या ट्रकवर १७ मजूर बसून प्रवास करत असताना अचानक ट्रक उलटल्याने सर्व मजूर त्याखाली दबले गेले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून, बचावकार्य सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पिशोर खांडी येथे ट्रक अचानक उलटल्याने सर्व मजूर ऊसाखाली दबले. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.या अपघातात अनेक मजूर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात येत आहे. प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे, तसेच ट्रक उलटण्याचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR