24.1 C
Latur
Monday, June 24, 2024
Homeराष्ट्रीयएअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला लागली आग; १८५ प्रवाशांचे वाचले प्राण

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला लागली आग; १८५ प्रवाशांचे वाचले प्राण

नवी दिल्ली : एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाने शनिवारी रात्री उड्डाण केल्यानंतर लगेचच एका इंजिनला आग लागल्याने बंगळुरू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यामुळे १८५ प्रवाशांचे प्राण वाचले आणि सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप खाली उतरवण्यात आले. विमान बंगळुरूहून कोचीला जात होते. सूत्रांनी सांगितले की, विमानाने उड्डाण केल्यानंतर लगेचच क्रू मेंबर्सनी एटीसीला इंजिनला आग लागल्याची माहिती दिली.

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त-याने सांगितले की, बंगळुरू-कोची विमानाने उड्डाण करताच उजव्या इंजिनला आग लागल्याचे निदर्शनात आले. यानंतर विमान परत उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि शनिवारी रात्री विमान बंगळुरू विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुखरूप विमानातून बाहेर उतरवण्यात आले. दरम्यान, या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त-यानी सांगितले. यानंतर प्रवाशांना दुस-या विमानाने प्रवासाची व्यवस्था करून देण्यात आली. यासोबतच आग कोणत्या कारणामुळे लागली याची सखोल चौकशी करण्यात येईल, अशी माहितीही प्रवक्त-यानी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR