21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रएसटी कर्मचा-यांना रजा देण्याच्या पद्धतीत स्पष्टता आणण्याची गरज

एसटी कर्मचा-यांना रजा देण्याच्या पद्धतीत स्पष्टता आणण्याची गरज

मुंबई : प्रतिनिधी
एसटी महामंडळात चालक, वाहक व यांत्रिकी कर्मचा-यांच्या रजा मंजूर करण्यात पक्षपातीपणा केला जातो. रजे बाबतीत कुठलीही स्पष्टता, नियम व निकष नसल्यामुळे राज्यातील महत्वाच्या ५० शासकीय उपक्रमांचा विचार केला. तर कर्मचा-यांच्या गैरहजेरीमध्ये एसटी महामंडळातील कर्मचा-यांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. रजेबाबतीत अधिकारी व पर्यवेक्षक हे मनमानी करीत आहेत, त्यामुळे रजा देण्याच्या पद्धतीत तत्काळ स्पष्टता आणली पाहिजे, असे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे.

राज्यातील अनेक शासकीय महामंडळे व उपक्रम यांच्या कर्मचा-यांना रजा देण्याच्या पद्धतीत व एसटी महामंडळातील कर्मचा-यांना रजा देण्याच्या पद्धतीत खूप मोठा फरक आहे. इतर शासकीय उपक्रमामध्ये रजा देण्याची एक विशिष्ठ पद्धत आहे. एसटी मध्ये मात्र कर्मचारी अचानक आजारी पडल्यास किंवा अचानक काम निघाल्यास त्याला कशी रजा देता येईल. या बद्दल कुठलीही स्पष्टता, निकष किंवा नियम घालून दिलेले नाहीत.

हे विदारक चित्र असून नेहमी अत्यावश्यक सेवा असल्याचे कारण देत रजा नाकारली जाते. परिणामी अचानक काही काम निघाल्यास किंवा आजारी पडल्यास नाईलाजास्तव कर्मचारी कामावर येऊ शकत नाही. अशा वेळी त्यांच्या खात्यावर २०० ते ३०० दिवस रजा शिल्लक असताना सुद्धा त्यांची गैरहजेरी लिहिली जाते. हे वास्तव असून रजा देण्याच्या पद्धतीत स्पष्टता आणली पाहिजे. व कर्मचा-यांची होणारी फरपट थांबवली पाहिजे, असेही बरगे यांनी म्हटले आहे.

शासकीय उपक्रमामध्ये गैरहजरीचे प्रमाण वाढले
राज्यात सण, यात्रा किंवा सार्वजनिक सुट्या असतात, त्या वेळी प्रवाशीसंख्या वाढलेली असते. व त्यावेळी एसटी कर्मचा-यांना मात्र जास्त काम असते. प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी कामगिरीवर उपस्थित राहावे लागतेच. इतर शासकीय उपक्रमामध्ये त्यांच्या कर्मचा-यांना सण, यात्रा व सार्वजनिक सुट्टी दिवशी त्यांच्या कर्मचा-यांना रजा दिली जाते. त्यामुळे इतर शासकीय उपक्रमामधील कर्मचा-यांच्या गैरहजेरीचे प्रमाण हे एक टक्क्यापेक्षा कमी असून तेच प्रमाण एसटीमध्ये मात्र पाच टक्के पेक्षा जास्त आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR