32.8 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeलातूरएसटी महामंडळाच्या लातूर विभागाला तीन महिन्यांत ८७ कोटींचे उत्पन्न

एसटी महामंडळाच्या लातूर विभागाला तीन महिन्यांत ८७ कोटींचे उत्पन्न

लातूर : प्रतिनिधी
सातत्याने आर्थिक तोट्यात असणारी एसटी नव्या वर्षात किमान नफा मिळवून आत्मनिर्भतेकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यापासून दिसत आहे. दिवसेंदिवस एसटी प्रवासी संख्या वाढत असल्याने लातूर एसटी महामंडळाच्या महसुलात वाढ होत आहे. महाराष्ट राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस आता सुपरफास्ट झाली असून तोट्यातून फायद्यात प्रवासी सेवा सुरू आहे. गेल्या तीन महिन्यात लातूर विभागातील एसटी बसने १ कोटी ५६ लाख ४४ हजार किलोमिटर प्रवास करून तब्बल ८७ कोटी ८१ लाख ६९ हजार रूपयांचा व्यवसाय केला आहे. तर ९५ लाख ९० हजार रूपयांचा निवळ नफा झाला आहे.
महाराष्ट राज्य परिवहन महामंडळाने ज्यादा प्रवासी वाहतूक, अमृत ज्येष्ट नागरीक यांजना, महिला सन्मान योजना यासह अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे या योजनेचा एसटी महामंडळाला चागलाच फायदा होत आहे. गेल्या तीन महिन्यात लातूर विभागाची तीजोरी भरली आहे. लातूर विभागाच्या कर्मचा-यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यात जानेवारी महिन्यात ५४ लाख ६९ हजार किलोमिटर एसटी धावली असून यातून ३२ कोटी ०८ लाख ९१ हजार रूपयांचा व्यवसाय झाला आहे. तर फेबे्रवारी महिन्यात ४८ लाख ५९ हजार किलोमिटर एसटी धावली असून यातून २८ कोटी ३३ लाख रूपयांचा व्यवसाय झाला आहे. तसेच मार्च महिन्यात ५३ लाख १६ हजार किलोमिटर एसटी बस धावली असून यातून २७ कोटी ३९ लाख २३ हजार रूपयांचा व्यवसाय झाला आहे. या तीन महिन्यातून लसतूर विभागाला यातून ५४ लाख ६९ हजार रूपयांचा निवळ नफा झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR