27.1 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeअंतरराष्ट्रीयऑस्ट्रेलियात मुलांना सोशल मीडियावर मनाई

ऑस्ट्रेलियात मुलांना सोशल मीडियावर मनाई

सोशल मिडीया प्लॅटफॉर्मला २७५ कोटींचा दंड

 

सेऊल : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियामध्ये १६ वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचे विधेयक संसदेने मंजूर केले. या विधेयकाला पक्ष आणि विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. असे विधेयक मंजूर करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश आहे.

विधेयकानुसार, जर एक्स, टिकटॉक, फेसबुक आणि इन्स्टाग्राम सारखे प्लॅटफॉर्म मुलांना खाती ठेवण्यापासून रोखण्यात अयशस्वी ठरले तर त्यांना २७५ कोटी रुपयांपर्यंत ($३२.५दशलक्ष) दंड होऊ शकतो. पालकांच्या संमतीसाठी किंवा आधीपासून अस्तित्वात असलेल्या खात्यांसाठी कोणतीही सूट दिली जाणार नाही. कायदा लागू झाल्यानंतर, बंदी कशी अंमलात आणायची यावर काम करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी मिळेल.

पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनीही या विधेयकाचे समर्थन केले. संसदेत बोलताना अल्बानीजने सोशल मीडियाला तणाव वाढवणारे साधन, ठग आणि ऑनलाइन गुन्हेगारांचे शस्त्र म्हणून वर्णन केले. ते म्हणाले की, ऑस्ट्रेलियन तरुणांनी फोन सोडून फुटबॉल, क्रिकेट आणि टेनिस खेळावे अशी त्यांची इच्छा आहे.

डीपफेक, डिजिटल अटक : भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून डीपफेक, डिजिटल अटक आणि ऑनलाइन फसवणूक यांसारखी अनेक प्रकरणे समोर येत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारत सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी एक सल्लाही जारी केला होता. यामध्ये त्यांना डीपफेक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे पसरवल्या जाणा-या चुकीच्या माहितीबाबत माहिती तंत्रज्ञान (आयटी) नियमांचे पालन करण्यास सांगितले होते.

ब्रिटन बंदी घालण्याच्या तयारीत
ऑस्ट्रेलियानंतर ब्रिटिश सरकार १६ वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा विचार करत आहे. ब्रिटनचे टेक्नॉलॉजी सेक्रेटरी पीटर काइल यांनी सांगितले की, ऑनलाइन सुरक्षितता निश्चित करण्यासाठी ते ‘काहीही करतील’ असे बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे. विशेषत: मुलांसाठी. स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा तरुणांवर होणा-या परिणामांवर अधिक संशोधन करण्याची गरज असल्याचेही पीटर काइल यांनी सांगितले.

११ सोशल मीडियावर १ भारतीय
रिसर्च फर्म ‘रेडसीर’च्या मते, भारतीय वापरकर्ते दररोज सरासरी ७.३ तास त्यांच्या स्मार्टफोनवर नजर ठेवतात. यातील बहुतांश वेळ ते सोशल मीडियावर घालवतात. तर, अमेरिकन वापरकर्त्यांचा सरासरी स्क्रीन वेळ ७.१ तास आहे आणि चीनी वापरकर्त्यांचा ५.३ तास आहे. भारतीय वापरकर्ते सोशल मीडिया अ‍ॅप्सचा सर्वाधिक वापर करतात. अमेरिका आणि ब्रिटनमधील एका व्यक्तीची सरासरी ७ सोशल मीडिया खाती आहेत, तर एक भारतीय किमान ११ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR