21.5 C
Latur
Saturday, February 24, 2024
Homeलातूरओबीसी पदाधिका-यांनी हरकत पत्र केले जमा

ओबीसी पदाधिका-यांनी हरकत पत्र केले जमा

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने दि. २६ जानेवारी रोजी (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम २००० नियम २०१२ यात सुधारणा करण्यासाठी जे नियम करण्याचे योजिले आहे, त्यासंदर्भात ‘हरकत पत्र’ लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दि. १ फेब्रुवारी रोजी राज्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव यांच्याकडे पाठवले आहे अशी माहिती ओबीसी-भटके विमुक्त बलुतेदार आरक्षण समर्थक संघर्ष समितीचे मुख्य संयोजक राजेंद्र वनारसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केली आहे.
ओबीसी पदाधिकारी शिष्टमंडळाने लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची भेट घेवून हरकत प्रमाणपत्र जमा केले. लातूर येथे ओबीसी राष्ट्रीय नेते छगनराव भुजबळ यांच्या उपस्थितीत जाहीर एल्गार महासभेचे आयोजन करणार अशी माहिती ओबीसी भटके विमुक्त बारा बलुतेदार संघर्ष समितीचे मुख्य संयोजक राजेंद्र वनारसे यांनी दिली. यावेळी ऍड. मंचकराव डोणे, ऍड. शिवकुमार स्वामी, राजपाल भंडे, राम आत्राम, ऍड. श्रीधरराव कसबेकर, अजीज बागवान, डॉ. व्यंकटराव जाधव, राजाभाऊ साबळे, उमेश उघडे, सुरज जाधव, ऍड. भालचंद्र कवठेकर आदि निवेदन देताना उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR