38.5 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeलातूरऔरादच्या पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणांवर हातोडा

औरादच्या पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणांवर हातोडा

निलंगा :  प्रतिनिधी
तालुक्यातील कोटमाळ ते औराद शहाजनी  रस्त्यावरील पानंद रस्त्यावरील अतिक्रमन अखेर कार्यवाही करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रशासनाने गुरुवारी येथील पानंद रस्त्यावरील कांहीं अतिक्रमणावर बुलडोजर चालवत अतिक्रमण हटविले . दरम्यान प्रशासन ऐकत  नसल्याने तिघांनी वेगळा पवित्रा  घेत अंगावर पेट्रोल टाकून  आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले . महसूल प्रशासन, पंचायत समिती, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत व राज्य उत्पादन शुल्क यांच्या संयुक्त कार्यवाहीने हे अतिक्रमण हटविण्यात आले.
अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेदरम्यान प्रशासन ऐकत नसल्याने तीन नागरिकांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला म्हणून औराद पोलीस ठाण्यात ग्रामविकास अधिकारी एस. एच. गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे यांनी सांगितले.
सदर अतिक्रमण मोहीमेत नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर, गटविकास अधिकारी सोपान आकेले, ग्रामविकास अधिकारी एस. एच. गिरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे, महावितरणचे अभियंता यू. बी. खामकर, मंडळ अधिकारी राजकुमार मिरजगावकर, विस्तार अधिकारी आडे, तलाठी बालाजी भोसले यांच्यासह ग्रामपंचायत कार्यालयाचे कर्मचारी औराद, निलंगा, कासार शिरशी व देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याने शहराला छावणीचे रूप आले होते

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR