औसा : प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मागील तीन वर्षाच्या तुलनेत यंदा प्रथमच उडदा मुगाची आवकमध्ये वाढ झाली असून मुगाच्या तुलनेत उडदाने बाजी मारली आहे. मागील पंधरवड्यात मुगाच्या राशी संपल्याने आवक मंदावली आहे तर उडदाची काढणी सुरू होऊन ती अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यंदा मुगापेक्षा उडदास मालाचा उतारा थोडा फरकाने अधिक आहे. यामुळे प्रथमच उडदाची आवक चांगली होत असून आत्तापर्यंतच्या खरेदीने ४ हजारकिं्वटलचा टप्पा ओलांडला आहे.
भाव हमीभावाच्या तुलनेत थोडाफार फरकाने मिळत असल्याने तालुका-परिसराबरोबर उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमा परिसरातील अनेक गावातून येथे माल विक्रीसाठी येत आहे. या मार्केट यार्डात (दि १) ऑगस्टपासून (दि. १५) सप्टेंबरपर्यंत एकूण उडदाची आवक तीन हजार सहाशेकिं्वटलपेक्षा अधिक झाली असून रविवार ( दि.१५) रोजी एका दिवसात एक हजार चारशे पन्नासकिं्वटल उच्चांकी आवक झाली आहे. उडदाचा हमीभाव ७ हजार ४००किं्वटल असून या मार्केटमध्ये कमाल ८ हजार ३४१ ते ७ हजार २०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. शिवाय येथे काटा पेमेंटची सोय असल्यामुळे तत्काळ शेतक-याच्या हाती पैसे मिळतात. त्यामुळे औसा तालुका- परिसरासोबत उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमावरील भागातील बलसूर, माडज, लोहारा, खसगी, कानेगाव, तुगाव, भोसगाव, आचलेर, राजुरी, वाडीवडगाव, मड्डी-सलगरा, पेठ, कवठा-केज आशा अनेक ठिकाणच्या शेतक-यांचा माल या यार्डात विक्रीसाठी येत आहे.