23.3 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeलातूरऔशात महाविकास आघाडीचा रस्ता रोको

औशात महाविकास आघाडीचा रस्ता रोको

औसा : प्रतिनिधी
खरीप हंगाम वर्ष २३-२४ पीकविमा सरसकट द्यावा. शेतक-याांची चालू व थकबाकी कर्ज माफ करावे. आचारसंहिता काळात वाटप झालेले घरकुल रद्द करावे. शहरातील मुख्य चौकातील उड्डाणपूल हा पिलरचा बांधावा. शहरातील बेघर घरकुल योजनांचे रद्द झालेले फेरप्रस्ताव शासनाला पाठविण्यात यावे. निराधार योजनेतील वंचित व बंद झालेल्या लाभार्थ्यांना त्वरित लाभ द्यावा. पीएम किसान योजनेतील अनेक पात्र व वंचित लाभार्थ्यांना योजनेचा निधी द्यावा. तालुक्यातील अनेक गावात घरकुल योजनेपासून वंचित ठेवलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा, आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीतर्फे शनिवारी सकाळी औसा-निलंगा रस्त्यावरील टी-पॉइंट जवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.
खरीप हंगाम २०२३-२४ पिकविमा सरसकट त्वरीत देण्यात यावी.शेतक-यांची सरसकट चालु व थकबाकी कर्ज माफी करण्यात यावी.आचारसंहिते मध्ये पंतप्रधान आवास घरकुल योजनेतून आचारसंहितेचे उलंघन करून वाटप झालेले घरकुल रद्द करण्यात यावे. औसा शहरातील मुख्य चौकातील उड्डाणपूल  पिल्लरचा बांधण्यात यावा. औसा शहरातील बेघर घरकुल योजना रद्द झालेले प्रस्ताव फेरप्रस्ताव शासनाला पाठवण्यात यावे. संगायो-इंगायो योजनेतील वंचित व बंद झालेल्या लाभार्थ्यांना त्वरीत योजनेचे लाभ देण्यात यावे. पी एम किसान योजनेतील अनेक पात्र व वंचित लाभार्थ्यांना योजनेचे निधी देण्यात यावे. औसा तालुक्यातील अनेक गावात घरकुल योजनेपासुन वंचित ठेवण्यात आले असल्याने त्यांना त्वरीत, घरकुलाचा लाभ देण्यात यावा. या सर्व मागणीसाठी पूर्व कल्पना देऊन सुद्धा आमच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्ता रोको आंदोलनात महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठयÞा संख्येने उपस्थित होते.
या रस्ता रोको दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन तथा  संचालक  अँड श्रीपतराव काकडे, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माजी आमदार दिनकर माने, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, रशीद शेख, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापूरे, नारायण लोखंडे, भरत सूर्यवंशी, जयश्री उटगे, सय्यद कलीम मौलाना, शामराव साळुंखे,  अझहर हाश्मी,   खुनमीर मुल्ला  सुरेश भुरे, संजय उजळंबे, सनाउल्ला शेख, आदी  पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR