29.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरऔसा मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढला

औसा मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढला

औसा : प्रतिनिधी
सातत्याने पुर्ण पाठपुरावा व जनतेने दिलेले आशर्विाद यामुळे आमदार अभिमन्यू पवार यांनी औशाच्या विकासाचा अनुशेष भरून काढला असून अशक्य वाटणारी कामेही त्यांनी पुर्ण करुन दाखवली आहेत. औसा शहराला सुमारे ५०० कोटींचा निधी दिला. किल्लारी सहकारी साखर कारखाना, शेतरस्ते, पांणद रस्ते, कासारसिरसी व किल्लारी अपर तहसील कार्यालय, किल्लारी भूकंपग्रस्तांचे रखडलेली कामे असतील आमदार पवार यांनी मार्गी लावली. येणा-या काळातही आपला आशीर्वाद अभिमन्यू पवार यांच्या पाठीशी राहू द्या असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
औसा व कासार सिरसी बसस्थानकांसह २२ कोटींच्या विकासकामांचा लोकार्पण आणि ८७ कोटींच्या विकासकामांचा भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते (दि.१४) रोजी ऑनलाईन झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते की, अभिमन्यू पवार यांनी केलेली विकासाचे कामे विधीमंडळातील उत्तम कामगिरी ही त्याची जमेची बाजू आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी औसा पाणीपुरवठ्याची मागणी माझ्याकडे केली होती. आणि ती मंजुरीही केली आता प्रत्यक्षात पाणीपुरवठा योजना सूरू झाली आहे. त्यामुळे गतवर्षी कमी पाऊस पडूनही टॅकरची आवश्यकता भासली नाही. औसा शहरातील मुख्य रस्त्याचे केवळ भूमिपूजन व्हायचे पण आ अभिमन्यू पवार यांच्या कारकीर्दीत ही कामे पूर्ण केली. आता शहरात सार्वजनिक शौचालयांची कामे अंतिम टप्यात आहेत.
 औसा शहराला सुमारे ५०० कोटींचा निधी दिला. किल्लारी सहकारी साखर कारखाना, शेतरस्ते, पांणद रस्ते, कासारसिरसी व किल्लारी अपर तहसील कार्यालय, किल्लारी भूकंपग्रस्तांचे रखडलेली कामे आमदार अभिमन्यू पवार यांनी मार्गी लावली त्यांच्या कारकीर्दीत औसा येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी १०० कोटी मंजूर केले असून ते काम लवकरच सुरू होईल.  मतदारसंघातील बेलकुंड येथे २५० हेक्टरवर एमआयडीसी मंजूर करून आम्ही थांबणार नाही तर तिथे उद्योगही आणणार आहोत, असे फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR