17.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूरऔसा येथे बायपास, आशीव येथे उड्डाणपूल द्या

औसा येथे बायपास, आशीव येथे उड्डाणपूल द्या

औसा : प्रतिनिधी

आमदार अभिमन्यू पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन औसा येथे बायपास व अशीव येथे उ्ड्डाणपूल करण्याची विनंती केली आहे. या प्रकरणी निवेदन देऊन याबाबत चर्चा केली आहे. दि. २४ जानेवारी, २०२३ रोजीच्या भेटीदरम्यान आमदार अभिमन्यू पवार यांच्या विनंतीवरून नितिन गडकरी यांनी लातूर- मुरुड- बार्शी- टेंभुर्णी या रस्त्याच्या चौपदरीकरण कामाचा डीपीआर, भूसंपादन व मंजुरीसह सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन पुढील ९ महिन्यांत निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश दिले होते. ९ महिने उलटून गेल्याने पुन्हा या विषयाचा पाठपुरावा यावेळी आ. पवार यांनी केला. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी ३ महामार्ग जाणा-या औसा शहरातील सध्याचा वाहतूककोंडीचा व भविष्यात त्यात होणा-या संभाव्य वाढीचा विचार करून तुळजापूर – औसा – रत्नागिरी आणि लातूर- औसा – उमरगा या महामार्गावरील वाहतूकीसाठी औसा शहराच्या पूर्वेला १ आणि पश्चिमेला १ बायपास निर्माण करण्यात यावा. लातूर – औसा – लामजना – किल्लारी या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे या मागण्यांचाही यावेळी पाठपुरावा केला.

तेरणा नदीवरील उजनी जवळील उड्डाणपुलावर दर पावसाळ्यात एका बाजूला पाणी थांबून प्रचंड वाहतूककोंडी होते. त्या पूलाची पुनर्बांधणी आणि मोठी नाली बांधकाम करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला तातडीने मान्यता देण्यात यावी.आशिव पाटी येथे आशिव – मातोळा – किल्लारी हा मार्ग जॉईंट असल्याने त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यासाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्यात यावी. बार्शी- धाराशिव- शिवली-बोरफळ- एनएच ३६१ आणि लामजना- निलंगा- कासार सिरसी- तुरोरी या घोषीत राष्ट्रीय महामार्गाला क्रमांक देऊन प्राधान्याने विकसित करण्यात यावा. तेर- भेटा- भादा- औसा शहर, एमडीआर ४५- पडोळी- एकंबी – उजनी – एनएच ३६१, एसएच २३८- हसलगण – संक्राळ – जवळगा (पो.)-चिंचोली तपसे – लामजना – एनएच ५४८, एमडीआर २०- धानोरा- शिवणखेड- ममदापूर- म्हसलगा – एसएच २४४- धानोरा – मदनसुरी- हाडोळी- रामंिलग मुदगड- एसएच २३७- जिल्हा सीमा, जाजन मुगळी- एसएच २४०- कासार सिरसी- बडूर- कासार बालकुंदा- तांबाळा आणि निलंगा गुंजरगा- येळणूर – चांदोरीवाडी- टाकळी- चिलवंतवाडी – कासार बालकुंदा – सरदारवाडी – हल्लाळी आदी रस्त्यांचे दुरुस्ती व सुधारणा करण्यासाठी तसेच निलंगा- येळणूर- कासार बालकुंदा रस्त्यावर चांदोरीवाडी गावाजवळ पूल बांधकाम करण्यासाठी केंद्रीय रस्ते निधीतून १४३ कोटी रुपये निधी मंजूर करावा.आदी कामाबद्दल पाठपुरावा केला. यावेळी नितीन यांनी एनएचएचे वरिष्ठ विभागीय अधिकारी फेगडे व असाटी यांना फोन करून लातूर- टेंभुर्णी चौपदरीकरण, लातूर- औसा- उमरगा चौपदरीकरण व औसा शहर बायपास इ. कामांचा तातडीने प्रकल्प अहवाल सादर करण्याचे तसेच इतर प्रस्तावित कामांना प्राधान्याने मंजुरी देण्याचे निर्देश दिले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR