29 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeलातूरकर्णकर्कश आवाज करणा-या १६९ सायलेंसर्सचा चौथ्यांदा लातूर पोलीसांकडून चुराडा

कर्णकर्कश आवाज करणा-या १६९ सायलेंसर्सचा चौथ्यांदा लातूर पोलीसांकडून चुराडा

लातूर : प्रतिनिधी

शहरातील दुचाकीना मॉडीफाय केलेले सायलेंसर लावून आवाज करत फिरणारे दुचाकी स्वार वाहतुक नियमांचे उल्लंघन करीत हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालये, ट्यूशन एरिया व तसेच इतर शांत ठिकाणी ध्वनी प्रदुषण करीत फिरतात, याचा रूग्नांना, विध्यार्थ्यांना व सामान्य नागरिकांना विनाकारण त्रास होत असल्याने तक्ररारी येत होत्या, लातूर पोलीसांकडून यापुर्वी तीन वेळेस मॉडीफाय केलेले फटाका सायलेंसर काढून दंड करुन काढण्यात आलेले सायलेंसर रोडरोलर खाली चुराडा करण्यात आले होते. सदर मोहिम चालू ठेवून दुचाकीवरुन हवा करत फिरणा-या अशाच अती उत्साही युवकांची हवा काढण्याची व त्यांना मोटार वाहन अधिनियमाचा पाठ शिकवण्यासाठी सोमय मुंडे पोलीस अधिक्षक, लातूर व डॉ. अजय देवरे अपर पोलीस अधिक्षक, लातूर, भागवत फुंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांचे नेतृत्वात वेळोवेळी कार्यवाही करुन मागील काळात १६९ मॉडीफाय सायलेंसर ताब्यात घेण्यात आले होते.

अशा प्रकारे कार्यवाही करत मागील ३ महिन्याचे काळात १६९ बुलेट म्फलर सायलेंसर, फटाका सायलेंसर ताब्यात घेण्यात आले होते, ताब्यात घेतलेल्या सायलेंसरचा पुनर्वापर होवू नये म्हणून ते आज दिनांक ९ रोजी पंचासमक्ष पंचनामा करुन त्यावर रोडरोलर चालवून नष्ट करण्यात आले आहेत. तसेच ते भंगारात विकून त्यातून मिळालेली रक्कम शासनास जमा करण्यात आली आहे. या अगोदरही अशाच प्रकारे दि. ५ एप्रील २०२३ रोजी १२५ व दि.२८ जुलै २०२३ रोजी १२३ मॉडीफाय म्फलर सायलेंसर व सात हॉर्न व दि. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी १५२ सायलेंसर नष्ट करण्यात आले होते. आज पावेतो मागील वर्षात एकूण ५६९ मफलर/फटाका सायलेंसरचा नाश करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR