18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरकलेमुळेच व्यक्ती महान होतो - कुलगुरू डॉ. मणी

कलेमुळेच व्यक्ती महान होतो – कुलगुरू डॉ. मणी

लातूर : प्रतिनिधी
मराठवाडा ही संतांची तसेच सांस्कृतिक भूमी आहे. या भूमीला समृद्ध वारसा लाभला आहे. आपल्याला आपल्या जननी व जन्मभूमीवर नेहमीच अभिमान आणि गर्व असला पाहिजे हे त्यांनी ‘जननी जन्मभूमीस्च स्वर्गादपि गरीयसी; या पंक्तीतून उद्घृत केले. व्यक्ती जीवन हे मर्यादित आहे, परंतु कला ही माणसाला चिरकाल जिवंत ठेवते. कलेमुळेच व्यक्ती महान होतो, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले
कृषि महाविद्यालय व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूरच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथे युवक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ. उदय खोडके, प्राचार्य डॉ. संजीव बंटेवाड, प्राचार्य डॉ. रणजीत चव्हाण, प्राचार्य डॉ.अच्युत भरोसे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पुरुषोत्तम झंवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. खोडके म्हणाले की, यापूर्वीही अनेक कार्यक्रमांना या सभागृहात येवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची संधी मला लाभली आहे. महाविद्यालयात खेळी-मेळीच्या वातावरणात स्पर्धेला प्रारंभ झाला. विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींनी नृत्य या प्रकारात लावणी, लोकनृत्य, समूहनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यानंतर संगीत व एकांकिका या मध्येही प्रेक्षकांना शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत, पाश्च्यात्य संगीत, एकाच ठिकाणी ऐकावयास मिळाल्यामुळे त्यांनी संगीताची दीपावली साजरी केली.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अनेक एकांकिकांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली. या मध्ये परिपाठ या एकांकीकीने स्त्रीसुरक्षेचा ज्वलंत विषय मांडला. तर जाता जाईना या विडंबनातील अरे माझ्यासोबत काढलेल्या फोटोला कोरडे लाईक आणि शेयर करण्यापेक्षा मला लाईक करून माझ्याशी काही शेयर करा रे हे आजच्या टेक्नोसॅव्ही नातवाला उद्धेशून केलेलं एका आजोबांच्या वाक्याने मन सुन्न झाले. अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पदक, सन्मानचिन्ह वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाची सर्व तयारी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे व त्यांच्या चमुने अल्पवधीतच केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दिनेशंिसह चौहान यांनी केले.सूत्रसंचालन डॉ. दयानंद मोरे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. ज्योती देशमुख यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR