32.5 C
Latur
Sunday, May 26, 2024
Homeलातूरकाँग्रेसचा जाहीरनामा पोहोचतोय घरोघरी

काँग्रेसचा जाहीरनामा पोहोचतोय घरोघरी

लातूर : प्रतिनिधी
लोकांमध्ये जावून, लोकांच्या गरजा, मागण्या जाणून घेवून काँग्रेस पक्षाने बनवलेला जाहीरनामा (न्याय पत्र) लातूर ग्रामीणमधील घरघरात पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी  लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. नागरिकांमधून या जाहीरनाम्याचे उत्स्फूर्त स्वागत होताना दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील ंिबदगीहाळ (ता. लातूर) येथे श्री. नेताजी शेंडगे यांच्या निवासस्थानी आमदार धिरज देशमुख यांनी स्रेहभेट घेवून गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्याशी मंगळवारी (ता. १६) संवाद साधला. त्यानंतर सलगरा बु येथे अनुरथ गव्हाणे यांच्या निवासस्थानी, सलगरा खु येथे बळीराम बावलगे यांच्या निवासस्थानी, मुशिराबाद येथे भरत मलवाडे यांच्या निवासस्थानी, बोकनगाव येथील किशोर दाताळ यांच्या निवासस्थानी गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांची स्रेहभेट घेतली. या भेटी दरम्यान आमदार धिरज देशमुख यांनी काँग्रेसचा जाहीरनामा नागरिकांना दिला.
आमदार धिरज देशमुख म्हणाले, काँग्रेसचे हे न्याय पत्र (जाहीरनामा) बंद खोलीत बनवले गेलेले नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी लाखो लोकांपर्यंत जावून, त्यांच्याशी संवाद साधून, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा, त्यांची स्वप्नं जाणून घेवून हा जाहीरनामा बनवला आहे. त्यामुळे जनतेला हा जाहीरनामा भावला आहे. म्हणूनच या जाहीरनाम्याचे समाजातील सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. गावागावात याचे वाचन होत आहे. काँग्रेसचा जाहीरनामा देशातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी बुथवर चोखपणे काम करावे, हा जाहीरनामा अधिकाधिक घरात घेऊन जावा, आपले उमेदवार डॉ. शिवाजी काळगे हे बहुमताने विजयी होण्यासाठी एकजुटीने मेहनत घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शाम भोसले, अनुप शेळके, सचिन दाताळ, सुनिल पडिले, धनराज दाताळ, प्रवीण पाटील, सुभाष घोडके, शंकर बोळंगे, राजकुमार पाटील, बळवंत पाटील, संभाजी रेड्डी, बालाजी वाघमारे, ज्ञानोबा गवळे, दगडूसाहेब पडिले, जितेंद्र स्वामी, सरवर शेख, पांडूरंग वीर, व्यंकट पाटील, श्रीरंग दाताळ, अमृतराव जाधव, प्रदीप पाटील, लक्ष्मण गायकवाड, गोंिवद सावंत, भारत शिंदे, राहूल पाटील, पांडूरंग दाताळ, किशोर दाताळ, शंकरराव पाटील, सिध्देश्वर स्वामी, दगडू कांबळे, अशोक सुडे, कमलाकर अनंतवाड, हरिभाऊ गोणे, लिंबराज पाटील, परमेश्वर बावलगे, पंडित गायकवाड, बालाजी मनदुमले, भरत मलवाडे, आकाश तिरुके, विपीन गवरे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कायकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR