21.2 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeलातूरकाँग्रेसच्या नवनियुक्त महिला पदाधिका-यांचा सत्कार

काँग्रेसच्या नवनियुक्त महिला पदाधिका-यांचा सत्कार

उदगीर : प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या नवनियुक्त महिला पदाधिका-यांचा सत्कार  तालुकाध्यक्ष कल्याण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.  जिल्हा महिला कांग्रेस कमेटीच्या अध्यक्षा श्रीमती शिलाताई पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरीय आणि जिल्हा स्तरीय समित्या पुनर्गठित केल्या आहेत. त्या अनुषंगाने उदगीर तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून श्रीमती संध्याताई पटवारी यांची निवड करण्यात आली आहे.उदगीर शहर कांग्रेसच्या अध्यक्षपदी सौ ललिताताई झिल्ले यांना कायम ठेवण्यात आले आहे.
सौ ज्योतीताई डोळे यांना शहर कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. सौ सरोजाताई बिरादार यांना जिल्हा उपाध्यक्षा म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. प्रमिलाताई सताळकर जिल्हा कार्यकरिणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. सौ ज्योतीताई  बोंडगे शहर (उपाध्यक्षा), कृष्णाबाई सुगावकर शहर सहसचिव, जिल्हा महिला कांग्रेस कमेटीच्या कार्यकारणी सदस्या सौ चारुशीला पाटील, महिला शिक्षक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा बालिकाताई मुळे, जायभाये ताई तसेच तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, जळकोट कृ.ऊ.बा. स. संचालक आशिष पाटील राजुरकर, वैजनाथ बोंडगे, दत्ताभाऊ सुरनर, राहुल रक्षाळे, धोंडिबा सुगावकर, बालाजी जलमपुरे, अनिल खडके या प्रसंगी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR