22.8 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeराष्ट्रीयकाँग्रेस नेते राहुल गांधींना नेत्यांसह कार्यकर्त्यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

काँग्रेस नेते राहुल गांधींना नेत्यांसह कार्यकर्त्यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते खासदार राहुल गांधी यांचा आज ५४ वा वाढदिवस आहे. राहुल गांधींसाठी हा वाढदिवस खूप खास आहे, याचे कारण लोकसभा निवडणुकीत पक्षाची चांगली कामगिरी आहे. यामुळे राहुल गांधींची प्रतिमा बदलली असून केवळ पक्षातच नाही तर भारतीय राजकारणातही राहुल गांधींचा दबदबा वाढला आहे. त्यामुळे राहुल गांधींसाठी हा वाढदिवस खूप खास आहे.

सूत्रांच्या मते, यावेळी राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेही होऊ शकतात. राहुल यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे देशात परिवर्तनाची लाट सुरू झाली असून, यामुळे काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. वाढदिवसानिमित्त राहुल गांधी यांनी आज जेव्हा दिल्लीतील पक्षाचे मुख्यालय गाठले. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले आणि पक्ष कार्यालयात केक कापून थाटामाटात ५४ वा वाढदिवस साजरा केला.

यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी, के. सी. वेणुगोपाल यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांनी उपस्थित राहून राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पक्षनेत्याच्या वाढदिवसाचे पोस्टर लावले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR