19.6 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeलातूरकांद्याला प्रति क्विंटल २०० रुपयांचा फटका

कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपयांचा फटका

लातूर : प्रतिनिधी

लातूरचा कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी उच्चांकी म्हणजेच ३ हजार ३५४ क्विंटल कांद्याची आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल भाव मिळाला २ हजार ३०० रुपये तर शिनिवारी १ हजार ३२२ क्विंटल आवक होती आणि भाव होता प्रतिक्विंटलला ३ हजार ५०० रुपये. केवळ दोन दिवसांच्या फरकाने कांद्या उत्पादक शेतक-यांना प्रतिक्विंटल २०० रुपयांचा फटका बसला आहे. कांद्याचे दर कोसळल्याने शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी ३ हजार ३५४ क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यास कमीभाव १२०० रुपये तर जास्तभाव २ हजार ३०० रुपये मिळाला. शनिवारी कमीभाव १५०० तर जास्त भाव २२०० रुपये होता. मात्र केवळ दोन दिवसांत शेतक-यांना प्रतिक्विंटलमागे २०० रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने कुठलीही मुदत न देता अकस्मात कांद्यावर निर्यातीवर बंदी घातल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बेमोसमी पाऊस आणि गारपिटीने कांद्याची प्रत अधिच खराब झाली. त्यात भाव घसरल्याने कांद्या मातीमोल विकण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दर शनिवारी आणि मंगळवारी कांदा, बटाटे, आद्रक, लसून यांचा लिलाव केला जातो. लातूर जिल्ह्यासह परिसरातील कांद्या उत्पादक शेतकरी बाजार समितीत कांद्या लिलावासाठी आणतात. मंगळवा-या लिलावात कांद्या प्रतिक्वंटलमागे २०० रुपयांपर्यंत कोसळल्याने शेतक-याच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आले. कांद्याच्या आवकमध्ये वाढ होत असतानाच केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लादल्यामुळे शेतक-यांना नुकसान सहन करावी लागत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR