25.2 C
Latur
Thursday, June 13, 2024
Homeलातूरकांबळगा संघ प्रथम तर शेंद उत्तर द्वितीय

कांबळगा संघ प्रथम तर शेंद उत्तर द्वितीय

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
युवा नेते अरंिवद पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शेंद उत्तर येथे सरपंच प्रतिनिधी देवा माने यांच्या गुरूमाऊली प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या श्री गुरूमाऊली क्रिकेट चॅम्पियनशिप टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा झाल्या असून अतितटीच्या झालेल्या सामन्याना तरूणांईनी भरभरून प्रतिसाद देत जल्लोष केला.

या क्रिकेट स्पर्धेत वीस संघांनी सहभाग घेतला होता. यात शेवटच्या सामन्यात राजमुद्रा क्रिकेट क्लब कांबळगा यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर श्री गुरूमाऊली क्रिकेट क्लब शेंद उत्तर यांना दुस-या स्थानावर समाधान मानावे लागले. प्रथम आलेल्या राजमुद्रा क्रिकेट क्लब कांबळगा यांना २५ हजार ५५५ रूपयांचे रोख पारितोषक व ट्राफी देण्यात आली. तर श्री गुरूमाऊली क्रिकेट क्लब शेंद उत्तर यांना द्वितीय पारितोषकात १० हजार १ रुपयां व ट्राफी देण्यात आली. दरम्यान शेंद उत्तरचे सरपंच प्रतिनिधी देवा माने यांनी तरूण सहका-यांंच्या साह्याने गावांत भाजपाचे प्रदेश सचिव अरंिवंद पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री गुरूमाऊली क्रिकेट चॅम्पियनशिप टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली प्रतिभा दाखविण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली.

या स्पर्धेत तालुक्यातील अनेक संघानी सहभाग नोंदवला. तर या स्पर्धेदरम्यान तरूणांना क्रिकेट चा थरार पहायला मिळाला. स्पर्धेच्या शेवटी विजेता प्रथम व द्वितीय संघांना रोख पारितोषिक व ट्राफी देण्यात आली. या बक्षीस वितरणाप्रसंगी श्री गुरूमाऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा स्पर्धा संयोजक देवा माने, बाबासाहेब सुरवसे, बालाजी सुरवसे, सुनिल जाधव, शरद पाटील, पंडित माने, नारायण माने, बाबासाहेब माने, गोंिवद मोरे, विठ्ठल पाटील, ज्ञानोबा सुरवसे, ज्ञानोबा माने, विनायक बिरादार, सुखानंद बिरादार उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR