22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeक्रीडाकांस्यपदकासाठी हॉकी संघ लढणार

कांस्यपदकासाठी हॉकी संघ लढणार

उपांत्य फेरीत जर्मनीकडून पराभव
पॅरिस : वृत्तसंस्था
भारताला आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकासाठी लढावे लागणार आहे. कारण हॉकीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारताला जर्मनीने पराभूत केले. त्यामुळे त्यांची अंतिम फेरी हुकली. आता भारताला कांस्यपदकासाठी खेळावे लागणार आहे. ८ ऑगस्ट रोजी ही लढत होणार आहे.

भारताचा यावेळी २-३ असा पराभव झाला. भारताने पहिल्या सत्रात गोल केला होता. त्यामुळे १-० अशी आघाडी होती. पण त्यानंतर जर्मनीने दोन गोल केले. त्यामुळे भारत १-२ असा पिछाडीवर पडला. पण भारताने हार मानली नाही. भारताचा कर्णधार हरमनप्रीतने दुसरा गोल केला. त्यामुळे भारताला जर्मनीशी २-२ अशी बरोबरी करता आली. जर्मनीने सामन्याची सहा मिनिटे शिल्लक असताना गोल केला आणि आघाडी घेतली.

चौथ्या क्वॉर्टरमध्ये जर्मनीने गोल करत ३-२ अशी आघाडी मिळवली. भारतीय संघाने अखेरच्या सेकंदापर्यंत चांगली झुंज दिली, पण अपयशी ठरले. उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने आता भारतीय संघ कांस्य पदकासाठीचा सामना खेळणार आहे. ८ ऑगस्टला ही लढत होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR