15.7 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeपरभणीकागदी कपात चहा, कॉफी व गरम पदार्थ विक्री करण्यास बंदीचे आदेश

कागदी कपात चहा, कॉफी व गरम पदार्थ विक्री करण्यास बंदीचे आदेश

परभणी : चहा, कॉफी, दुध, डिकाशनसह अन्य गरम पदार्थ विक्री करण्यासाठी व्यावसाईक मोठ्या प्रमाणात कागदी कपाचा वापर करत आहेत.

या कपात गरम पदार्थ टाकल्याने वितळणारे प्लास्टिक पोटात जाऊन कॅन्सर सारखे दुर्धर आजाराची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. या आजाराच्या कचाट्यात सापडलेल्या व्यक्तींची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व कार्यालयांना कागदी कपाच्या बंदीबाबत कडक अंमलबजावणी करण्यासाठी आदेश निर्गमीत केले आहेत. आत या आदेशाची अंमलबजावणी संबंधित विभाग करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते सय्यद रफीक पेडगांवर यांनी जिल्हा प्रशासनाला कागदी कपाच्या वापर रोखण्यासाठी बंदी घालून या बंदीची कडक अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला दि.२३ डिसेंबर रोजी एक निवेदन दिले होते. जिल्हा प्रशासनाने पेडगांवकर यांच्या निवेदनाची दखल घेत जिल्ह्यातील सर्व कार्यालयांना कागदी कपाच्या बंदीबाबत कडक अंमलबजावणी करण्यासाठी सामान्य प्रशासनाच्या उपजिल्हाधीकारी संगीता चव्हाण यांनी आदेश निर्गमीत केले आहेत. आता या आदेशाची अंमल बजावणी संबंधीत विभाग तात्काळ करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR