28.7 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeलातूरकिनगाव - कारेपूर रस्त्याचे काम होतेय निकृष्ट

किनगाव – कारेपूर रस्त्याचे काम होतेय निकृष्ट

किनगाव : जाकेर कुरेशी
सार्वजानिक बांधकाम विभाग अहमदपूर अंतर्गत किनगाव कारेपूर रोडवर खानापूर पाटी ते गुंजोटी पाटी दरम्यान रोड रुंदीकरणाचे काम सुरु आहे. रोडवरील झाडे न काढताच दोन झाडा मध्ये गिट्टी आतरून त्यावर काळी माती टाकून दबई केली जात आहे. संबंधीत अधिकारी व गुत्तेदारांची मिलीभगत मैत्रीअसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मुग गिळून गप्प आहेत. एका सामाजिक कार्यकर्त्याने मंगळवारी काळी माती टाकुन रोड बनवत असल्याचे चित्रीकरण करून काम बंद केले आहे .
अहमदपूर सार्वजानिक बांधकाम विभाग अंतर्गत किनगाव कारेपूर रोडवर खानापूर पाटी ते गुंजोटी पाटी दरम्यान अरुंद ३०० मिटर रोडचे रुंदीकरणाचे काम सुरु आहे. संबंधीत गुत्तेदारांनी रोड मधील काटेरी बाबळीचे झाडे न काढता साईट पट्या मधील पाच फुट आणि एक ते दिड फुट खोल माती काढून घेतली. माती काढलेल्या ठिकाणी गिट्टी आंतरली आहे. रोडमध्ये आलेल्या काटेरी बाभळीची झाडे तशीच आहेत. आतरलेल्या गिट्टीवर  चक्क मरुमा ऐवजी रोडवरून खोदून काढलेली काळी माती टाकून दबई करणे सुरु आहे. निकृष्ट कामामुळे वर्षातून दोन वेळा रोड करण्याची वेळ येत आहे. एका जाणकर सामजिक कार्यकर्त्यां गिट्टीकर काळी माती टाकून रोड तयार करीत असतानाचे चित्रीकरण करून मरूम टाकून काम करण्याची तंबी देऊन काम बंद केले आहे.
संबंधीत वरिष्ठ अधिका-यांनी प्रत्यक्ष रोडची पाहणी करून निकृष्ट काम करणा-या गुत्तेदारावर कार्यवाही करावी. हा रोड माती टाकुनच बनवला तर संबंधीत अधिकारी व गुत्तेदाराविरोधात रितसर निवेदन देऊन रस्ता रोको करून आंदोलन करण्याच्या तयारीत वाहन चालक आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR