23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरकिल्लारी, परिसरात वादळी वा-यासह दमदार पाऊस

किल्लारी, परिसरात वादळी वा-यासह दमदार पाऊस

किल्लारी : वार्ताहर
किल्लारी व परिसरात रविवारी दि. १२ मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वा-यासह जवळपास पाऊन तास दमदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारा पडल्याचेही सांगण्यात आले. या वादळीवा-यामुळे जवळपास चाळीस विद्यूत पोल वाकडे झाले आहेत.

रविवारी दि. १२ मे रोजी दुपारच्या सुमारास अचानक ढग जमा होऊन पाऊस झाला. जवळपास पाऊन तास पाऊस झाला. वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले होते. पुनर्वसीत किल्लारीच्या कांहीं भागांत तुरळक ठिकाणी गारा पडल्याचे सांगण्यात आले. हा पाऊस किल्लारीसह नदीहत्तरर्गा, सांगवी जेवरी, किल्लारी वाडी, गुबाळ, मंगरूळ, येळवट आदी गावांत झाला. जोरदार वादळी वा-यामुळे किल्लारी येथील बाजार पेठेतील अनेक दुकानांचे फलक वा-याने उडून गेले. वादळामुळे विद्युत प्रवाहाच्या तारा तुटल्या. किल्लारी, सिरसला, लामजना येथील विद्युत खांब वाकडे झाले. अनेक ठिकाणी जमीनदोस्त झाल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला.

शेत शिवारात अनेक शेतक-यांची झाडे पडली. जनावरांचा चारा भिजला आहे. या पावसामुळे सुदैवाने कोणतेही मोठे नुकसान, जिवीतकिंवा वित्त हानी झाली नाही. हा पाऊस दमदार झाल्याने जमिनीत चांगली ओल झाली आहे. अनेक शिवारात बांधाच्या बाजूस पाणी साठले आहे. या पावसामुळे शेतीच्या मशागतीला चांगला वेग येणार आहे. जमिनीत काही अंशी चांगला ओलावा झाल्याने नांगरणी व कुळवणी व अन्य शेती कामांना योग्य पाऊस झाल्याने शेतकरी बोलत आहेत. प्रचंड उकाड्यापासून कांहीं अंशी दिलासा मिळाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR