24.3 C
Latur
Tuesday, June 25, 2024
Homeक्रीडाकॅनडाचा आयर्लंडला दे धक्का

कॅनडाचा आयर्लंडला दे धक्का

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आज सलग दुस-या दिवशी धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. काल अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव करून सर्वांना अवाक केले. तेच आज कॅनडाने तगड्या आयर्लंडला पराभवाची धूळ चारली. आयर्लंडचा हा अ गटातील हा दुसरा पराभव आहे. त्यामुळे त्यांचे सुपर ८ मधील आव्हान संपुष्टात आले आहे.

कॅनडाने हा विजय मिळवून तिस-या क्रमांकावर झेप घेतली. या स्पर्धेत कॅनडाने पाकिस्तानला गुणतालिकेत खाली ढकलले. कॅनडाचा हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पधेर्तील पहिलाच विजय ठरला. खराब सुरुवातीनंतर कॅनडाने पुनरागमन करीत ७ बाद १३७ धावांपर्यंत मजल मारली. कॅनडाचे ४ फलंदाज ५३ धावांत तंबूत परतले. त्यानंतर सावरत कॅनडाने निर्धारित षटकांत ७ बाद १३७ धावा केल्या.

माफक आव्हान असल्याने आयर्लंड हे आव्हान सहज पेलेल, असे वाटत होते. परंतु या संघाचीही घसरगुंडी झाली. अखेरच्या टप्प्यात म्हणजे आयर्लंडला १२ चेंडूत २८ धावा हव्या होत्या. १९ व्या षटकात ११ धावा काढल्या. त्यामुळे अखेरच्या षटकात १७ धावांची गरज होती. परंतु या षटकात ५ धावाच करता आल्या. त्यामुळे आयर्लंडचा १२ धावांनी पराभव झाला. पाकिस्तानला नवख्या अमेरिकेने जसे पराभूत केले. तसेच कॅनडाने बलाढ्य आयर्लंडचा पराभव केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR