नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रीय महिला आयोगाने आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याची स्वत:हून दखल घेतली. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्वातीला मारहाण करणा-या बिभव कुमारला पुन्हा नोटीस पाठवण्यात आल्याचे एनसीडब्ल्यूच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी म्हटले आहे. त्यांनी या नोटीसला उत्तर न दिल्यास त्यांची टीम आता त्यांच्या निवासस्थानी जाणार आहे. आपण स्वातीलाही भेटणार असल्याचे सांगितले आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या, या प्रकरणाकडे बारकाईने पाहत होतो. आमच्यात मतभेद होते पण आम्ही नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो. स्वाती बोलू शकते असे वाटल्यावर त्यांनी काल तक्रार दिली आणि त्यानंतर गुन्हा दाखल झाला. कारवाईचा अहवाल तयार केला आहे. मी स्वाती सोबत स्वत: बोलेल… स्वातीवर मानसिक आणि शारीरिक आघात झाला आहे.
पोलिस बिभव कुमारला शोधत आहेत. आम्ही उद्या पर्यंत वाट पाहू… उद्या जर बिभव स्वत: आला नाही तर आम्ही त्याच्या घरी जाऊन चौकशी करू. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना माहीत होत काय होत आहे. मात्र त्यांना त्याच काहीही पडलेले नाही… मुख्यमंत्री महिलांसोबत नाहीत. केजरीवाल बिभवच्या बाजूने आहेत, असे रेखा शर्मा म्हणाल्या.
मी स्वत: स्वाती मालीवाल यांच्या सोबत उभी आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांची पत्नी यांची देखील चौकशी केली जाईल, असे रेखा शर्मा यांनी सांगितले.
दरम्यान स्वाती मालीवाल आज तीस हजारी न्यायालयात पोहोचली, प्राणघातक हल्ला प्रकरणी जबाब नोंदवला आहे. स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बिभवविरोधात एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी बिभवचा शोध घेण्यासाठी १० पथके तयार केली आहेत.