23.2 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeराष्ट्रीयकॉँग्रेसही प्रस्थापित नेत्यांचे विधानसभेचे तिकिट कापणार

कॉँग्रेसही प्रस्थापित नेत्यांचे विधानसभेचे तिकिट कापणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. तसेच सर्वच प्रमुख पक्षांनी या निवडणुकीसाठीच्या तयारीला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर काँग्रेसने या विधानसभा निवडणुकीसाठीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी सोमवारी झालेल्या काँग्रेसच्या छाननी समितीच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच हरियाणा आणि काश्मीरमधील तिकीट वाटपाबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कठोर भूमिका घेतल्याचेही दिसून आले.

राहुल गांधी यांनी या बैठकीमध्ये सांगितले की, कितीही मोठा नेता असला तरी केवळ त्यांच्या शिफारशीच्या आधारावर उमेदवारी देण्यात येऊ नये. तर पक्षातील सक्षम कार्यकर्त्याला उमेदवारी दिली गेली पाहिजे. मग त्याच्या नावाची शिफारस कुठल्या बड्या नेत्याने केलेली नसली तरी हरकत नाही. तसेच बाहेरून आलेला नेता विजय मिळवू शकतो किंवा निवडून येण्यासाठी आवश्यक सामुग्री त्याच्याकडे आहे, एवढ्या कारणामुळे त्याला उमेदवारी दिली जाऊ नये, तर पक्षाच्या कार्यकर्त्याचा विजय होण्याची शक्यता असेल, तर त्याला उमेदवारीसाठी प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, कुठल्याही नेत्याला केवळ तो मोठा नेता आहे म्हणून तिकीट मिळणार नाही. नेता मोठा असेल आणि तो विजयी होण्याची शक्यता असेल, पण त्याच्यावर भ्रष्टाचार, गंभीर आरोप, महिला आणि दलितांविरोधातील गंभीर गुन्ह्याबाबत खटला सुरू असेल तर त्यांना उमेदवारी मिळता कामा नये. तसेच उमेदवार निश्चितीसाठी पक्षाकडून सर्व्हेही केला जात आहे. त्यामुळे तुमच्याकडून सुचवली जाणारी नावं आणि पक्षाकडून करण्यात येणा-या सर्व्हेमधून समोर येणारी नावं, यांची पडताळणी केली जाईल, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR