27.1 C
Latur
Wednesday, December 25, 2024
Homeसोलापूरकॉलेज तरुणींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंवर कारवाई करावी

कॉलेज तरुणींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंवर कारवाई करावी

युवा सेना कॉलेज कक्षाची पोलिसांकडे मागणी

कुईवाडी : कुर्डुवाडी येथे सार्वजनिक ठिकाणी उभा राहून कॉलेज तरुणींना छेडणाऱ्या रोडरोमिओंवर त्वरित कारवाई करावी, यासाठी पोलिसांनी लक्ष द्यावे असे लेखी निवेदन पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांना युवासेना कॉलेज कक्ष तालुका प्रमुख यांनी दिले आहे. यावर अशा रोडरोमिओवर त्वरित कारवाई करीत, बंदोबस्त करतोय असे आश्वासन यावेळी पोलिस निरीक्षकांनी त्यांना दिले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कुर्डुवाडी शहरातील दहावी, अकरावी मुलींच्या खासगी क्लासेस, कॉलेज रोड या ठिकाणी उभा राहून महाविद्यालयीन युवती, तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींची अश्लील हावभाव, तसेच इशारे करून वाईट कंमेट करून रोडरोमिओ छेड काढत आहेत. येथील महात्मा जोतिराव फुले कॉलेज व के. एन. भिसे महाविद्यालयांच्या मुलींना छेडछाड करणे त्रास देणे, याच्या अगोदरही येथील अशा युवकांवर छेडछाड अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मात्र, तरी देखील त्यांची खोड मोडलेली नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करून सर्व युवती भयमुक्त कराव्यात. अन्यथा, युवासेना कॉलेज कक्ष व युवतीसेना यांना आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी सारंग बागल (युवा सेना कॉलेज कक्ष तालुकाप्रमुख), अमन बागवान, ओमकार राऊत, पवन पाटील, अविनाश मेहेर, तेजस बागल व इतर कॉलेज कक्ष पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR