21.4 C
Latur
Sunday, October 20, 2024
Homeमहाराष्ट्रकोथरुड मतदार संघातून चंद्रकांत पाटील यांना पुन्हा उमेदवारी

कोथरुड मतदार संघातून चंद्रकांत पाटील यांना पुन्हा उमेदवारी

पुणे : प्रतिनिधी
पुणे शहर आणि जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या सहा उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सहा उमेदवारांमध्ये केवळ चिंचवड मतदार सघातील उमेदवार बदलण्यात आला आहे. तर राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुन्हा कोथरुड मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पर्वती विधान सभा मतदार संघातून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ तर शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे,भोसरी विधानसभा मतदार संघातील आमदार महेश लांडगे आणि दौंड विधानसभा मतदार संघातील आमदार राहुल कुल यांना पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर चिंचवड मतदार संघात विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्या ऐवजी शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आतापर्यंत शहर आणि जिल्ह्यातील एकवीस पैकी सहा उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे अन्य मतदार संघातील उमेदवारी कोणाला मिळणारे याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कोथरुड, पर्वती आणि शिवाजीनगर मतदार संघातील अनेक इच्छुकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. पण या मतदार संघात विद्यमान आमदार उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झाले आहेत.

त्यामुळे इच्छुक कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. काही दिवसापूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी बैठक घेऊन कार्यकर्त्यांची समजूत काढली आहे.

दरम्यान महाविकास आघाडीच्या एकाही मतदार संघातील उमेदवारांची घोषणा अद्याप झाली नाही. त्यामुळे एकवीस मतदार संघातील भावी आमदार कोण असणारं याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR