15.7 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरात लग्नसमारंभातील जेवणात घातले विष

कोल्हापुरात लग्नसमारंभातील जेवणात घातले विष

मामाचा भाचीच्या लग्नातला प्रताप

कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापुरातील एका मामाने आपल्या भाचीचे लग्न उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. या मामाने भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील जेवणात विषारी औषध टाकून सर्वांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान, कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उत्रे भागातील ही घटना आहे.

भाचीने आठवड्याभरापूर्वी आपल्या मर्जीविरोधात गावातील मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्याने बदनामीच्या रागातून मामाने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. महेश जोतिराम पाटील असे मामाचे नाव आहे. या प्रकरणात पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

लग्नाच्या स्वागत समारंभातील जेवणात विषारी औषध टाकून पाहुण्यांच्या जीवाला धोका पोहोचण्यापूर्वी सुदैवाने हा प्रकार उघडकीस आला. जेवणात विषारी औषध टाकताना मामा आणि आचा-याची झटापट झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. आचा-याच्या समोरच अन्नामध्ये विषारी औषध टाकल्याचा प्रकार घडल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.

दरम्यान उत्रे गावातील एका तरुणाशी तिचे प्रेम जुळले. मामाचा लग्नाला विरोध असल्याने भाचीने आठवड्यापूर्वी पळून जाऊन लग्न केले होते. त्यानंतर नव-या मुलांकडील मंडळींनी मंगळवारी गावातील एका हॉलमध्ये लग्नाच्या स्वागत सभारंभाचे आयोजन केले होेते. तसेच लग्नानंतर उत्रे गावात नवरदेवाच्या कुटुंबीयांकडून फटाक्यांची आतषबाजी झाल्याने मामाच्या संतापात भर पडली. त्यानंतर आयोजित केलेल्या लग्न समारंभात मामाने सर्वांना मारण्याचा प्रयत्न करीत जेवणात विषारी औषध टाकले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR