30.3 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमुख्य बातम्या‘कोव्हिशिल्ड’नंतर ‘कोवॅक्सिन’चे साइड इफेक्ट्स उघडकीस!

‘कोव्हिशिल्ड’नंतर ‘कोवॅक्सिन’चे साइड इफेक्ट्स उघडकीस!

एस्ट्राझेनकाची कोव्हिड-१९ लस कोव्हिशिल्ड वादात सापडल्याच्या काही आठवड्यांनंतर, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनमुळेही काही दुष्परिणाम होत असल्याचे एका नवीन अभ्यासात आढळून आले. संशोधकांनी शोधून काढले आहे की, ज्या किशोरवयीन मुलींना अ‍ॅलर्जीचा इतिहास होता त्यांना कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर ‘एइएसआय’ होण्याचा धोका जास्त आहे.

याप्रकरणाचा अहवाल ‘स्प्रिंगरल्ािंक’वर प्रकाशित करण्यात आला. भारत बायोटेकच्या लसीच्या दुष्परिणामांवरील निरीक्षणात्मक अभ्यासात ‘एइएसआय’ सारख्या प्रतिकूल घटनांची नोंद झाली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी दिग्गज फार्मा कंपनी एस्ट्राझेनकाने लंडनमधील न्यायालयात कबूल केले होते की, त्यांच्या लसीमुळे दुर्मिळ प्रकरणांमध्ये त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. यानंतर खळबळ उडाली.

१,०२४ लोकांचा समावेश असलेल्या या अभ्यासात, केवळ ६३५ किशोरवयीन आणि २९१ प्रौढ व्यक्तींना एका वर्षाच्या फॉलोअपमध्ये संपर्क साधता आला. होता

यामध्ये असे आढळून आले की, ३०३ पौगंडावस्थेतील आणि १२४ प्रौढांमध्ये व्हायरल अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची नोंद झाली आहे.

हा अभ्यास सांख शुभ्रा चक्रवर्ती आणि बनारस हिंदू विद्यापीठातील तज्ञांनी केला होता आणि त्यात असे आढळून आले की, बहुतेक ‘एइएसआय’ एक वर्षानंतरही टिकून आहे.

अभ्यासात सहभागी झालेल्यांमध्ये अ‍ॅलर्जीचा इतिहास असलेल्या काहींना, विशेषत: महिला आणि किशोरवयीन मुलींमध्ये टायफॉइडची प्रकरणे नोंदवली गेली.

कॉमोरबिडीटीस असलेल्या प्रौढांना सतत ‘एईएसआय’चा सामना करण्याची शक्यता दुप्पट आहे. परंतु हे देखील लक्षात आले की, प्रतिकूल घटनांचे नमुने प्रौढ आणि किशोरवयीन मुलींमध्ये भिन्न आहेत. उच्चरक्तदाब असलेल्या प्रौढांना लसीकरणानंतर ‘एईएसआय’चा जास्त धोका असल्याचे सांगण्यात आले.
चौकट…
संशोधकांना रुग्णांमध्ये पुढील गोष्टी आढळल्या …
सामान्य विकार – १०.२%
त्वचा, त्वचेखालील विकार – १०.५%
मस्कुलोस्केलेटल विकार – ५.८%
मज्जासंस्थेचे विकार – ५.५%
मासिक पाळीतील असामान्यता – ४.६%
गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्णांना गुइलेन-बॅरे स्ािंड्रोम आणि स्ट्रोकचा त्रास होतो. परंतु हे अनुक्रमे फक्त १% आणि ०.३% प्रकरणांमध्ये होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR