24.1 C
Latur
Monday, June 24, 2024
Homeक्रीडाकोहलीला जीवे मारण्याची धमकी

कोहलीला जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील आयपीएल २०२४ चा एलिमिनेटर सामना आज अहमदाबादमध्ये होणार आहे. आरसीबीने या सामन्यापूर्वी सराव रद्द केला. मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहलीला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्यामुळे त्याची सुरक्षा लक्षात घेऊन संघाने सराव तसेच पत्रकार परिषदही रद्द केली आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

आज संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून राजस्थान आणि बंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी आरसीबीने सराव सत्र रद्द केले. यासोबतच दोन्ही संघांनी पत्रकार परिषदही रद्द केली. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात पोलिसांनी ४ जणांना अटक केली असून, ते दहशतवादी असल्याचा संशय पोलिसांना आहे. यामुळे क्रीडा जगतात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR