30.3 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeक्रीडाकोहलीला पाहण्यासाठी स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी; ३ जखमी

कोहलीला पाहण्यासाठी स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी; ३ जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
टीम इंडियाचा माजी कर्णधार १२ वर्षांनंतर रणजी सामन्यात उतरला आहे. कोहली दिल्ली संघातून रेल्वेविरुद्धचा सामना खेळत आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना सुरू आहे. यावेळी कोहलीला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये एकच गर्दी केली. यामुळे स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. यात तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळते.

गर्दीला नियंत्रित करताना एक सुरक्षारक्षकही जखमी झाला आहे. जखमींवर डीडीसीए सुरक्षा आणि पोलिसांनी तात्काळ प्रथमोपचार केले.

विराट कोहलीला पाहण्यासाठी चाहत्यांनी पहाटेपासूनच स्टेडियमबाहेर रांगा लावल्या होत्या. स्टेडियमबाहेर मोठी गर्दी झाली आणि आत घुसण्यासाठी गेट क्रमांक १६ बाहेर चाहत्यांमध्ये धक्काबुक्की झाली. यात काही जण जखमी झाले. यावेळी अनेक दुचाकींचेही नुकसान झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR