23.3 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeराष्ट्रीयखासदार ओवेसींच्या दिल्लीतील घरावर शाईफेक

खासदार ओवेसींच्या दिल्लीतील घरावर शाईफेक

नवी दिल्ली : हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील घरावर काही समाजकंटकांनी शाई फेकल्याच्या घटनेवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चिंता व्यक्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम बिर्ला यांनी आज संसदेत ओवेसी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शाईफेक करणा-या आरोपींवर कारवाई करणाचे आश्वासन दिले. यासोबतच दिल्ली पोलिस मुख्यालयाजवळील हाय सिक्युरिटी झोनमध्ये घडलेल्या या घटनेमुळे ओम बिर्ला यांनी दिल्ली पोलिस आयुक्तांनाही नोटीस पाठवली आहे.

१८व्या लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेताना ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ‘जय पॅलेस्टाईन’चा नारा दिला होता. या प्रकरणावरून गुरुवारी रात्री ९ वाजल्यानंतर मध्य दिल्लीतील ३४ अशोक रोडवर असलेल्या ओवेसींच्या बंगल्यावर सुमारे ६ ते ७ तरुण पोहोचले आणि त्यांनी बंगल्याच्या गेटवर आणि भिंतीवर ओवेसींच्या विरोधात पोस्टरच चिकटवले आणि त्यांच्या नावाच्या फलकावर काळी शाईही लावली. या घटनेनंतर, आरोपींनी ओवेसी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारा व्हीडीओ बनवला आणि ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या. विशेष म्हणजे ओवेसी यांचा बंगला पोलिस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे.

दरम्यान, खासदार ओवेसींनी या घटनेनंतर केंद्र सरकारवर हल्ला चढवला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या देखरेखीखाली हा हल्ला झाला असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला आहे. आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून ओवेसी यांनी अशा हल्ल्यापासून सुरक्षेची हमी मागितली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR