21.7 C
Latur
Saturday, February 1, 2025
Homeराष्ट्रीय‘खेलो इंडिया’ला चालना देणार

‘खेलो इंडिया’ला चालना देणार

२०३६ मध्ये ऑलिम्पिक आयोजनाचे मानस ३५१.९८ कोटी रुपयांची तरतूद

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात क्रीडा जगताला केंद्र सरकारकडून एक मोठी भेट मिळाली असून जिथे सरकारने अर्थसंकल्पात मोठी वाढ जाहीर केली आहे. तळागाळातील खेळाडूंचा शोध घेण्यासाठी आणि त्यांचे पालनपोषण करण्यासाठी सरकारच्या प्रमुख ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमाला सर्वात मोठी चालना मिळाली आहे, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्पात क्रीडा आणि युवा व्यवहारांसाठीची तरतूद वाढवून ३५१.९८ कोटी रुपये करुन वाढवली आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाला एकूण ३७९४.३० कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत.

राष्ट्रीय क्रीडा महासंघांना मदत करण्यासाठी राखीव ठेवलेली रक्कम देखील ३४० कोटी रुपयांवरून ४०० कोटी रुपये करण्यात आली आहे. भारत सध्या २०३६ च्या ऑलिंपिक खेळांचे आयोजन करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्याने आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीशी आधीच चर्चा केली आहे. यासोबतच, राष्ट्रीय शिबिरे आयोजित करण्यासाठी आणि खेळाडूंच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी नोडल संस्था असलेल्या भारतीय क्रीडा प्राधिकरण साठीची तरतूद ८१५ कोटी रुपयांवरून ८३० कोटी रुपये करण्यात आली आहे.

नाडा बजेटही वाढले
राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेचे (नाडा) बजेट २०.३० कोटी रुपयांवरून २४.३० कोटी रुपये करण्यात आले आहे. १९९८ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय क्रीडा विकास निधीतील योगदान सलग दुस-या वर्षी १८ कोटी रुपये राहील, तर सरकारने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दिले जाणारे अनुदान ४२.६५ कोटी रुपयांवरून या वर्षी ३७ कोटी रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.

जम्मू आणि काश्मीरलाही भेट
जम्मू आणि काश्मीरमध्ये क्रीडा सुविधा वाढवण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, जो गेल्या वर्षीपेक्षा १४ कोटी रुपये जास्त आहे. वाढीव अर्थसंकल्पाचा मोठा भाग राष्ट्रीय सेवा योजनेसाठी जाईल, ज्याला ४५० कोटी रुपये मिळतील, जे गेल्या वर्षीपेक्षा २०० कोटी रुपये जास्त आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR