28.7 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeसोलापूरखोटे लग्न करून नवऱ्यांना फसविणाऱ्या महिलांच्या टोळीस अटक

खोटे लग्न करून नवऱ्यांना फसविणाऱ्या महिलांच्या टोळीस अटक

मोहोळ पोलिसांची कामगिरी

मोहोळ :
खोटे लग्न करून नवऱ्यांना फसविणाऱ्या महिलांच्या टोळीस मोहोळ पोलिसांनी अटक केली असून नववधू अद्याप फरार आहे. निर्मला पृथ्वीराज बाविस्कर (वय ५६, रा. वे उल्हासनगर भाग ४, जि. ठाणे), लता नवनाथ पदक (वय ४५, रा. राजुरा, जि. संभाजीनगर), पिंकी अशोक ढवळे (वय २५, रा. हाजीमलंग रोड, . कल्याण, जि. ठाणे), लता धनराज चव्हाण (वय ४५, रा. हाजीमलंग रोड, कल्याण, जि. ठाणे) अशी व अटक करण्यात आलेल्या टोळीतील न महिलांची नावे असून त्यांना न्यायालयाने ३० मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला व आहे. तर विशाखा श्रीकृष्ण छापाणी . (वय ४०, रा. नया अकोला, जि. – अमरावती) आणि तिचा भाऊजी शैलेश (वय ३४) हे दोघे फरार आहेत. याबाबत नितीन विष्णु भोसले (वय २५, रा. वाळूज देगाव, ता. मोहोळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळूज देगाव येथील नितीन भोसले यांचा भाऊ सचिन भोसले याचे लग्न जुळविण्यासाठी लता पदक या लग्न जमविणाऱ्या महिला एजंटाशी फोनवरून ओळख झाली. मुलगी दाखवून लग्न लावून देण्यासाठी न लता हिने भोसले यांच्याकडून वेळोवळी पैसे घेतले. , लता पदक हिने आपल्या साथीदारांना घेऊन २ एप्रिल – २०२४ रोजी भोसले यांच्याकडे मुलगा पाहायला , जाऊन सचिन याच्याशी विशाखा छापानी हिचा . विवाहच करून दिला. लग्नानंतर विशाखा ही १३ , एप्रिलपर्यंत भोसले यांच्या घरी सासरी राहिली आणि त्याचदिवशी तिचा शैलेश नावाचा भाऊजी भोसले यांच्या घरी आला व विशाखा हिच्या माहेरी कार्यक्रम , असल्याचे सांगून तिला घेऊन गेला.

घरातून जाताना व विशाखा हिने रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दगिने घेऊन गेली. बरेच दिवस झाल्यानंतर विशाखा ही परत येत नाही व तिचा संपर्कदेखील होत नसल्याने आपली फसवणुक झाल्याचे भोसले यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे भोसले यांनी मोहोळ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

त्यावरून मोहोळ पोलिसांनी सापळा लावून यातील महिला एजंट लता पदक हिच्याशी तिच्या मोबाईलवर संपर्क केला व एक मुलगा लग्नाचा असून त्यासाठी मुलगी पाहण्यास सांगितले. त्यावेळी लता हिने मुलगी दाखवून लग्न करून देण्यासाठी अडीच लाख रूपये द्यावे लागतील असे सांगितले. पैसे देण्यास तयार असल्याचे सांगितल्यानंतर लता ही तिच्या टोळीला घेऊन पंढरपूरात आली.

त्याठिकाणी पोलिसांचा डमी नवरदेव मुलगा व लताच्या टोळीतील खोटी नवरी पिंकी, तिची खोटी आई लता चव्हाण आणि विशाखा हिची मावशी निर्मला याची भेट झाली. भेटीनंतर लगचे लग्न करण्याचे ठरल्याने हे सर्वजण पेनूर येथील नक्षत्र मंगल कार्यालयात आले. त्याठिकाणी या सर्वांना गुंतवून ठेऊन पोलिसांनी भोसले यांना मंगल कार्यालयात पाठविले. भोसले यांनी सर्व महिलांना ओळखल्यानंतर मोहोळ पोलिसांनी चौघीं महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली.

त्यावेळी लग्न करण्यास इच्छुक असलेल्या मुलांना फसवूण त्यांच्याकडून रकमा घेऊन त्यांची खोटी लग्ने लाऊन दिली जातात. त्यानंतर खोटी नवरी ही त्या मुलांच्या घरातील रोकड व दागिने घेऊन पळून जायची अशा प्रकारचे गुन्हे या टोळीकडून केले जात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून या चौघींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना ३० मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हवालदार आदलिंगे पुढील तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलिस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे, अप्पर अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, पोलिस उपविभागीय अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या नेतृत्वाखाली अमंलदार धनाजी घोरपडे, चंद्रकांत आदलिंगे व महिला कर्मचारी कल्याणी महामुनी यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR