20.2 C
Latur
Sunday, November 10, 2024
Homeलातूरगंगाधर गुंडला  मिळाला जामीन 

गंगाधर गुंडला  मिळाला जामीन 

लातूर : प्रतिनिधी
बहुचर्चित नीट पेपर लीक प्रकरणी लातूर येथील गुन्ह्यात दि. २६ जून रोजी डेहराडून येथून अटक करण्यात आलेला दिल्लीचा संशयित आरोपी गंगाधर गुंड लातुरातील संशयित आरोपीच्या संपर्कात आला होता. या प्रकरणात गंगाधर गुंडच्या वकिलांनी न्यायालयात चुकीच्या ओळखीमुळे गुंड यास अटक झाल्याचा युक्तिवाद केला. त्यावर सीबीआय विशेष न्यायालयाने गंगाधर गुंड यास जामीन मंजूर केला.
लातुरातील नीट पेपर लीक प्रकरणात नांदेडच्या दहशतवादविरोधी पथकाने दि. २२ जून रोजी संशयितांची चौकशी करून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. नांदेडच्या दहशतवादविरोधी पथकाला संशयितांच्या चौकशीदरम्यान दिल्लीचा गंगाधर नामक व्यक्ती न्यायालयीन कोठडीत असलेल्या संजय तुकाराम जाधवच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. तसेच संजय जाधवच्या मोबाईलमध्ये गंगाधर दिल्ली या नावाने सेव्ह असलेला भ्रमनध्वनी नंबरही मिळून आला होता. यावरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत इतर संशयित आरोपीबरोबरच दिल्लीचा गंगाधर पूर्ण नाव माहीत नाही मो. न. ९९११३३०१६५ चा उल्लेख केला होता. त्यामुळे सीबीआयने मोबाईल लोकेशनच्या आधारे गंगाधरचा शोध घेतला. तेव्हा तो डेहराडून येथे असल्याचे समोर आले. त्यावेळी सीबीआयने २६ जून रोजी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
दरम्यान, सीबीआय न्यायालयात संशयित आरोपी गंगाधर गुंड याचे वकिल अ‍ॅड. कैलास मोरे यांनी सीबीआयने शोधलेली व्यक्ती ही नसून, चुकीच्या ओळखीमुळे गुंडेला चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचा युक्तीवाद करीत जामिनाची मागणी केली. त्यावर सीबीआयच्या वकिलांनी याला विरोध केला. सीबीआयने गुंडचा संशयितांशी संवाद आणि गुन्ह्यात वापरलेला मोबाइल क्रमांक यावरून या प्रकरणाशी संबंध जोडल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणने ऐकूण गंगाधर गुंडला जामीन मंजूर केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR