25.3 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeलातूरगंगापूर गावाची पाण्याची प्रतीक्षा संपली

गंगापूर गावाची पाण्याची प्रतीक्षा संपली

लातूर : प्रतिनिधी
गंगापूर ग्रामपंचायतचे गावातील सर्व पाण्याचे स्त्रोत आठ दिवसांपूर्वी कोरडे ठक पडले होते. त्यामुळे गावातील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो की काय असा प्रश्न पडला होता. गंगापूर गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत तावरजा धरणातून पाणीपुरवठा योजनेचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. गावातील अंतर्गत काम अंतिम टप्प्यात आहे. पण आपल्या जुन्या योजनेची एमएसईबीची थकबाकी असल्याने नवीन योजनेसाठी एमएसईबी डिमांड भरुन घेत नसल्याने नवीन योजना चालू झाली नव्हती. याची कल्पना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या लक्षात आणून दिल्यानतंर त्याांनी तत्काळ एमएसईबीच्या अधिका-यांना बोलून मार्ग काढला. त्यामुळे एमएसईबी कार्यकारी अभियंता सामसे, मुरुडचे उपकार्यकारी अभियंता शेडेंकर, मुरुड अकोला शाखा अभियंता कुलकर्णी यांनी यत्रंणा लावून चार दिवसात सर्व दुरुस्तीचे कामे करून विज उपलब्ध करून दिली त्यामुळे तावरजा धरणातून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.

गंगापूर गावासाठीचा पाण्याचा प्रश्न सोडवल्या बद्दल आमदार अमित विलासराव देशमुख यांचे गंगापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने मन:पूर्वक धन्यवाद. यासाठी कठोर परिश्रम घेतलेले सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, एमएसईबीचे अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायतचे कर्मचारी, जिवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता आदींची ग्रामपंचायतीकडून आभार व्यक्त करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR