26.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमुख्य बातम्यागुहागरमध्ये निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक

गुहागरमध्ये निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक

गुहागर : भाजपचे नेते निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुहागर येथे भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी राणे समर्थक आणि ठाकरे समर्थकांनी दगडफेक करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलीसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधूराच्या कांड्या फोडल्या.

भाजपचे माजी आमदार निलेश राणे यांची गुहागर येथे जाहीर सभा होती. भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात तळी येथे होत असलेल्या या सभेला विरोध केला जात होता. यावेळी भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. निलेश राणे यांच्या सभेपूर्वी हा राडा झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR