30.6 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeलातूर‘गो-ग्रीन’द्वारे वीजग्राहकांची वीस लाख रुपयांची वार्षिक बचत

‘गो-ग्रीन’द्वारे वीजग्राहकांची वीस लाख रुपयांची वार्षिक बचत

लातूर : प्रतिनिधी
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेअंतर्गत वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडणा-या लातूर परिमंडलातील पर्यावरणस्रेही १६ हजार ४७९  ग्राहकांकडून १९ लाख ७७ हजार ४८० रुपयांची वार्षिक बचत सुरू आहे. वीजग्राहकांनी  ‘गो-ग्रीन’चा पर्याय निवडून पर्यावरणस्नेही व्हावे, असे आवाहन मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार वीजग्राहकांनी छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’ मधील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ‘एसएमएस’द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांना ‘प्रॉम्प्­ट पेमेंट’चा लाभ घेणे अधिक शक्य झाले आहे. गो-ग्रीन योजना ही काळाची गरज आहे. वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे व पर्यावरण रक्षणात योगदान द्यावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. लातूर परिमंडलांतर्गत  येणा-या बीड मंडलातील ५ हजार ४८४ वीजग्राहक ‘गो-ग्रीन’मध्ये सहभागी झाले आहेत. तसेच धाराशिव मंडलातील ३ हजार ७७७ वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’मध्ये सहभाग घेतला आहे. या योजनेत सर्वाधिक सहभाग हा लातूर मंडलात असून ७ हजार २१८ ग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेचा लाभ घेतला आहे.
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी  ग्राहकांनी  वीजबिलावर छापलेल्या जीजीएन या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ऍपद्वारेकिंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreen.jsp या लिंकवर जाऊन करावी. याबाबतची अधिक माहिती www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची  गरज  भासल्यास  त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करुन ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांची वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याचीकिंवा मूळ स्वरुपात रंगीत प्रिंट करण्याची सोय उपलब्ध आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR