28.8 C
Latur
Sunday, March 3, 2024
Homeलातूरग्रामपंचायती देणार १८ प्रकारचे प्रमाणपत्र

ग्रामपंचायती देणार १८ प्रकारचे प्रमाणपत्र

लातूर : योगीराज पिसाळ
लोकसेवा हमी कायद्यानुसार अधिसुचीत नसलेल्या कांही सेवा जिल्हयातील ग्रामपंचायतीला द्याव्या लागतात. सदर प्रमाणपत्र देताना ग्रामपंचायतीमध्ये विसंगती आढळते. तसेच कांही बाबींची खातरजमा न करता दाखले दिले जातात. यामुळे ब-याच वेळा न्यायालयीन वाद, कायदेशीर आडचणीचा व नागरीकांच्या रोषास सरपंच व ग्रामसेवक यांना सामोरे जावे लागते. असे वाद उद्भवू नये म्हणून जिल्हा परिषदेने जिल्हयातील ग्रामपंचायतींकडून देण्यात येणा-या १८ प्रकारच्या प्रमाणपत्र वितरणात सुसुत्रता यावी म्हणून निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीकडून नागरीकांना सदर प्रमाणपत्रे ऑनलाईन व ऑफलाईन देण्याची सोय करण्यात आली आहे.

लातूर जिल्हयातील ७८६ ग्रामपंचायतींच्याकडून ग्रामस्थांना सातत्याने विविध प्रमाणप्रत्रांची सेवा देण्यात येते. या बाबतचा विचार करून सहपत्र अ मध्ये अधिसुचित असलेल्या ७ सेवा, सहपत्र ब अधिसुचित नसलेल्या ११ सेवा ग्रामपंचायतीच्या स्तरावर ऑफलाईन व ऑनलाईनही नागरीकांना उपलब्ध होणार आहेत. तसेच नागरीक सहपत्र क मध्ये स्वयंघोषणेद्वारे स्वीकारल्या जाणा-या १५ सेवा या आपल्या सहीने चालवू शकतात. त्यासाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही.

जिल्हयातील ग्रामपंचातींकडून अधिसुचित नसलेल्या सेवा यात बांधकाम, इमारत मजूर कामगार प्रमाणपत्र, ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देणे, जन्म, मृत्यू नोंद अनुपल्ब्धता प्रमाणपत्र, जागा उपलब्धता व चतु:सिमा प्रमाणपत्र, देखभाल दुरूस्ती प्रमाणपत्र, उपयोगिता प्रमाणपत्र, काम इतर कुठल्याही योजनेतून मंजूर, प्रस्तावीत नसल्याचे प्रमाणपत्र, समाजकल्याण विभागाच्या लाभ देण्याचे प्रमाणपत्र, कुटूंब प्रमाणपत्र, फेरफार प्रमाणपत्र, गावठाण प्रमाणपत्र हे ग्रामपंचायतींकडून देण्याची सोय आहे.

सहपत्र अ मध्ये अधिसुचित सेवा
ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी, उद्योग व्यवसायासाठी, सण-उत्सव, निवडणूक कामकाजासाठी ग्रामपंचायत स्तरावर विधि प्रमाणपत्रांची मागणी करण्यात येते. त्यासाठी अनुषंगीक कायदे, नियम व शासन आदेशानुसार ग्रामपंचायतींनी आवश्यक कागदपत्रे योग्य ती शहानिशा करून ग्रामसेवकांच्या स्वाक्षरीने असे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. यात सहपत्र अ मध्ये अधिसुचित असलेल्या जन्म नोंद दाखला, मृत्यू नोंद दाखला, विवाह नोंद दाखला, दारिद्रय रेषेखालील असल्याचा दाखला, ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला, नमुना ८ चा उतारा, निराधार असल्याचा दाखला या सेवा नागरीकांनी अर्जाद्वारे मागणी केल्यास ग्रामपंचायती ऑनलाईन कार्यप्रणाली कार्यान्वित असेल त्या ठिकाणी सदर सेवा संगणकीकरण प्रतिद्वारे देण्याची सोय आहे. तर ऑनलाईन कार्यप्रणाली नाही अशा ठिकाणी विहित नमुन्यात सेवा देणे ग्रामपंचायतीला बंधणकारक आहे.

स्वयं घोषणा प्रमाणपत्राद्वारे या सेवा स्विकारल्या जातात
नागरीकांना कांही प्रमाणपत्रे ग्रामपंचायतीकडून घ्यावे लागतात. तर १५ प्रमाणपत्रे स्वत: सही करून वापरू शकतात. यात रहिवाशी प्रमाणपत्र, विधवा प्रमाणपत्र, परितक्त्या असल्याचे प्रमाणपत्र, विभक्त कुटूंब असल्याचे प्रमाणपत्र, नौकरी व्यवसायासाठी ना हरकत प्रमाणपत्र, हयातीचे प्रमाणपत्र, शौचालयाचे प्रमाणपत्र, नळ जोडणी अनुमती प्रमाणपत्र, विज जोडणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र, जि. प. फंडातून कृषि साहित्य खरेदीसाठी, राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थान कार्यक्रम, बचत गटांना खेळते भाग भांडवल बँकेमार्फत कर्जपुरवठा, कोणत्याही योजनेचे लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, निराधार योजनेसाठी वयाचे प्रमाणपत्रांचा समावेश असल्याची माहिती उपमुख्यकार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR