32.5 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeराष्ट्रीयग्रामीण मागणीत भारत चीन-अमेरिकेच्या पुढे!

ग्रामीण मागणीत भारत चीन-अमेरिकेच्या पुढे!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
क्रेडिट रेटिंग देणारी एजन्सी मुडीजकडून भारतासाठी दिलासा देणारी आकडेवारी आली आहे. मुडीजने २०२४-२५ साठी भारताचा विकासाचा वेगाचा अंदाज वाढविला आहे. सामान्य मान्सून आणि कृषी उत्पादनांमध्ये सुधारणा झाल्यामुळे ग्रामीण मागणीत सुधारणा दिसून येत असल्याचे म्हटले आहे.

मूडीजने २०२४ आणि २०२५ साठी भारताच्या विकास दराचा अंदाज वाढवला आहे. मूडीजने २०२४ मध्ये वास्तविक जीडीपी वाढीचा अंदाज ६.८ टक्क्यांवरून ७.२ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, तर २०२५ साठी भारताचा विकास दर अंदाज ६.४ टक्क्यांवरून ६.६ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार सर्वात वेगाने वाढणा-या १० अर्थव्यवस्थांमध्ये भारतानंतर चीन दुस-या स्थानावर आहे. तर इंडोनेशिया तिस-या स्थानावर आला आहे. हे भारतासाठी महत्वाचे आहे. युद्धात गुरफटलेला रशिया ५ व्या स्थानावर आहे, तर आपल्या ताकदीने जगाला वेठीस धरणारा अमेरिका सातव्या स्थानावर आहे.

भारत केवळ या वर्षीच नव्हे तर पुढील वर्षीही जगातील सर्वात वेगाने वाढणारा विकास दर राहणार आहे. फिचच्या मते, खाजगी गुंतवणूक, मजबूत सेवा क्षेत्र आणि पायाभूत सुविधा खर्चामुळे भारताच्या वाढीला मदत झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR