28.7 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeमहाराष्ट्रग्राम बीजोत्पादनातून शेतकरी सक्षम होईल -रमेश चिल्ले

ग्राम बीजोत्पादनातून शेतकरी सक्षम होईल -रमेश चिल्ले

करडखेल : दिवसे दिवस शेती तोट्यात जाते आहे. शेतीसाठी लागणा-या निविष्ठांचे दर गगनाला भिडत आहेत. वाढत्या इंधन खर्चामुळे यांत्रिकीकरणाद्वारे होणा-या मशागतीचा खर्च वाढतो आहे . दरवर्षी एकाच प्रकारची पिके घेतल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता घटते आहे, म्हणून शेतक-यांनी कंपनीकडून बीजोत्पादन घेऊन अधिकचा भाव पदरी पाडून घ्यावा .तसेच माती परीक्षण करून मोजकी व हवी तीच खते वापरून ,शून्य मशागत पध्दतीचा वापर केल्यास शेतीतून चार पैसे शिल्लक राहून शेतकरी सक्षम होण्यास मदत होईल असे प्रतिपादन कृषी तज्ञ, निवृत्त कृषी अधिकारी रमेश चिल्ले यांनी केले .

करडखेल तालुका उदगीर येथे फार्मरिच प्रोडूसर कंपनी , कृषी विभाग आणि महाधन अ‍ॅग्रीटेक लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी पीक परिसंवादात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते . कृषी पर्यवेक्षक सुनील चव्हाण यांनी सोयाबीन बियाणे उगवण क्षमता व घरचे बियाणे वापरण्याबाबत माहिती सांगितली तर महाधन चे मार्केंिटग मॅनेजर साईनाथ मोरे यांनी कंपनी विषयी, सोयाबीन व इतर पिकांना लागणारी खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये व विद्राव्य खताबाबत माहिती सांगितली.

ग्रामपंचायत मैदानावर संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ पार्वती नारायण मुसने तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतशील शेतकरी नागनाथ पांचाळ व प्रभुअप्पा राघु,पोलीस पाटील एकनाथ कसबे ,कृषी सहाय्यक संजय सिंह चव्हाण ,संचालक गणेश सनगले, नागनाथ चिल्ले तर शेतकरी म्हणून नागनाथ मुसणे, गोकुळ निडवंचे ,शिवाजी शेकसरे, निवृत्ती मुडबे, गफार तांबोळी,मानोहर हत्ते, मधुकर बजगीरे, आदी शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक कंपनीचे कार्यकारी संचालक प्रणव चिल्ले यांनी कंपनीचे अ‍ॅग्रोमॉल करडखेल पाटी वर पाडव्याच्या दिवशी सुरू केले असून,तिथे शेतीविषयक सर्व बाबी उदगीरच्या दरात एकाच छताखाली मिळणार असल्याने शेतक-यांना शहरात जाऊन नाहक खर्च करावा लागणार नाही.सूत्रसंचालन प्रा. बालाजी हालसे तर आभार सौरभ माने यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR