22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरग्राम संसद सिकंदरपूरची नॅक समितीकडून पाहणी

ग्राम संसद सिकंदरपूरची नॅक समितीकडून पाहणी

लातूर : प्रतिनिधी
चन्न बसवेश्वर फार्मसी कॉलेज (डिग्री), लातूर राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सिकंदरपूर हे गाव निवडले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेतून गावात आरोग्यासह महाविद्यालयाने कोण कोणते उपक्रम राबवले याची पाहणी करण्यासाठी दिल्ली वरून एन.ए.ए.सी. टीमचे प्रमुख डॉ. शंकर राव, कॉर्डिंनेटर मेंबर डॉ. विजय जुयल, मेंबर डॉ.अब्दुल रहेमान यांनी लातूर तालुक्यातील सिकंदरपूर गावाला भेट देऊन गावातील विविध विकास कामांची पाहणी केली.

ग्राम संसद परिसर सुशोभीकरण, ग्राम स्वछता, शुद्ध पाणी फिल्टर नियोजन, रेन हार्वेस्टिंग प्रकल्प, विहीर पुनरभरण, गांडूळ खत प्रकल्प, परसबाग, बोलकी शाळा, बोलकी अंगणवाडी, अंगणवाडी संरक्षण भिंतीची रंगरंगोटी, पक्के रस्ते, वृक्ष लागवड व संगोपन, सुसज्ज ग्राम संसद भवन इमारत याची पाहणी केली. तसेच सिकंदरपूरच्या उच्च विद्या विभुषित, उपक्रमाशील महिला सरपंच सौ. रेशमा माधवराव गंभीरे या आपल्या गावचा चौफेर विकास करत असून गावचे विकसित मॉडल बनवत आहेत असे गौरोदगार चेअरपर्सन डॉ. शंकर राव यांनी काढले. तसेच पुढील काळात सिकंदरपूरच्या चौफेर विकासाचे मॉडल महाराष्ट्रासह इतर राज्यातील सरपंचांनी पाहण्यासारखे आहे, असे मत व्यक्त केले.

प्रस्ताविकात सरपंच गंभीरे यांनी चन्न बसवेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी गावात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आरोग्य शिबीर, लेक वाचवा लेक शिकवा, बाल विवाह, एड्स जण जागरण, वृक्ष लागवड, कर वसुली पथ नाटयाच्या माध्यमातून जनजागृती केलेले काम कौतुकास्पद आहे अशी माहिती मान्यवरना दिली. या वेळी यशदा प्रविण प्रशिक्षक माधवराव गंभीरे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ओमप्रकाश भुसनूरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश मानके, ग्रामसेवक कलबुने के. बी.सह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व विध्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR