28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरघरणीचे पाणी पेटले; आत्मदहनाचा प्रयत्न 

घरणीचे पाणी पेटले; आत्मदहनाचा प्रयत्न 

लातूर : प्रतिनिधी
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील घरणी प्रकल्पावर ४० गावांचा पाणीपुरवठा अवलंबुन आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पात पाणी कमी, माती अधिक आहे. असे असताना या प्रकल्पातून चाकुर नगर पंचायतसाठी पाणी पुरवठा करण्याच्या योजनेस जलसंपदा विभागाने मंजूरी दिली आहे. ही मंजूरी तत्काळ रद्द करावी, घरणी प्रकल्पातून आमच्या हक्काचं पाणी पळवू नये, अशी करीत दि. १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नळेगाव येथील जिल्हा विकास संनियंत्रण व दक्षता समिती लातूरचे सदस्य अनिल विश्वनाथ चव्हाण व त्यांच्या नेतृत्वातील काही जणांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले आहे.
घरणी प्रकल्पावर नळेगाव, देवंग्रा, सुगाव, हिप्पळगाव, शिवपूर, शिरुर अनंतपाळ, उजेड, लिंबाळवाडी आदींसह ४० गावांचा पाणीपुरवठा अवलंबुन आहे. या प्रकल्पात महत्वाचे असे मत्स्यबीज केंद्र चालते. यह्याप्रकल्पात सध्या मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. मुळातच या प्रकल्पात पाणी कमी होत असताना चाकुर नगर पंचायतने पाणी पुरवठा योजना या प्रकल्पातून करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावास जलसंपदा विभागाने मंजुरीही दिली असल्याचे वृत्त आहे. ही मंजूरी तात्काळ रद्द करावी व ४० गाव्या हक्काचे पाणी अबाधिकत ठेवावे, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.  ताब्यात घेण्यात आलेल्यामध्ये अनिल चव्हाण, उमाकांत सांवत, शिवाजी बरचे, दयानंद मानखेडे, राजेंद्र शेलार, घृष्णेश्वर मलशेटे, ईशवर पांढरे, राजेंद्र सावंत, व्यंकट माचवे, सुभाष तेलंगे, भुजंग अर्जुने, दत्तात्रय नरवाडे, कृष्णा पांचाळ, बाळासाहेब बरचे, सुनील भोसले, नवनाथ मानखेडे आदींचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR