28.5 C
Latur
Tuesday, May 28, 2024
Homeमहाराष्ट्रघाटकोपर दुर्घटनेतील मृतांची संख्या १४ वर

घाटकोपर दुर्घटनेतील मृतांची संख्या १४ वर

मुंबई : मुंबईमध्ये सोमवारी भीषण वादळ आले. या वादळात मोठी दुर्घटना घडली आहे. घाटकोपर परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले. या दुर्दैवी घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे.

मृतांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले. त्याखाली तब्बल १०० जण अडकले होते. दरम्यान या होर्डिंगबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. हे होर्डिंग पूर्णपणे अवैध असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे.

मुंबई महापालिकेकडून जारी करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, हे होर्डिंग उभारण्यासाठी महापालिकेकडून संबंधितांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. हे होर्डिंग जीआरपीच्या जागेवर उभाण्यात आले होते. या होर्डिंगबाबत संबंधित व्यक्तींनी जीआरपीला माहिती दिली होती, असा दावा मुंबई महापालिकेकडून करण्यात आला आहे. या दुर्घटनेमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला असून, ४२ जणांवर उपचार सुरू आहेत.

तर ३१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटना झालेल्या ठिकाणची पाहणी केली. तसेच रुग्णालयात जाऊन त्यांनी जखमींची भेट देखील घेतली. ‘झालेली घटना दुर्दैवी आहे, महापालिकेची यंत्रणा आणि राज्याची डिझास्टर टीम रेस्क्यू ऑपरेशन करत आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. मुंबईतल्या सगळ्या होर्डिंगचे स्पेशल ऑडिट करायला मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना सांगितले आहे.

परवानगी आणि लायसेन्स नसलेली होर्डिंग काढून टाकायला सांगण्यात आले आहे. जखमींच्या उपचारांचा खर्च सरकार करेल. ज्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपये तात्काळ दिले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR