22.4 C
Latur
Tuesday, July 23, 2024
Homeमहाराष्ट्रघाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण

घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण

डॉक्टरांचे काम बंद आंदोलन

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
शहरातील घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले. वार्ड १९ मध्ये एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर आवश्यक ते उपचार करीत होते, तरीही या रुग्णाच्या उपचाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे म्हणत नातेवाईकांनी मारहाण केल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला.

दरम्यान, छ. संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

या मारहाणीत संबंधित निवासी डॉक्टर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मारहाण करणा-यांना अटक करण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन करीत असल्याचे मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. रोहन गायकवाड यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR