23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रघातक शस्त्रे अवैधरित्या विकणारी टोळी जाळ््यात

घातक शस्त्रे अवैधरित्या विकणारी टोळी जाळ््यात

अमरावती : अमरावती पोलिसांनी शहरात मोठी कारवाई करीत अवैध घातक शस्त्रे विक्री करणा-या ६ जणांच्या टोळीला अटक करण्यात आली. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने १०२ खंजर चाकू, २ चायना चाकू आणि २ देशी कट्टे जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली. या कारवाईची माहिती आज पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.

आगामी काळात ख्रिसमस तसेच शहरात महाशिवपुराण कथासारखे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईला महत्त्व आहे. अमरावती शहर पोलिस आयुक्तांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेच्या पथकांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत होती. त्याचवेळी पथकाला घातक शस्त्रे विक्री करणा-या टोळीची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी अब्दुल सोहेल अब्दुल शफी (वय १९ वर्ष, रा. गुलीस्तानगर) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे १ खंजर आणि २ चायना चाकू मिळाले. त्याची सखोल चौकशी केल्यावर त्याने साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार टोळी प्रमुख अकरम खान उर्फ गुड्डु वल्द बादुल्ला खान (१९, रा. अलीमनगर), टोळी सदस्य फरदीन खान युसुफ खान (वय २१ वर्ष, रा. राहुलनगर), मुजम्मील खान जफर खान (२१, रा. गुलिस्तानगर), शेख सुफियान मोहम्मद अशफाक (रा. यास्मीननगर), जाहेद शहा हमीद शहा (२०, रा. लालखडी) असे सहा जणांना अटक करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR