25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरचाकूर वन विभागाचा वन्य प्राण्यासाठी केवळ देखावा

चाकूर वन विभागाचा वन्य प्राण्यासाठी केवळ देखावा

चाकूर : प्रतिनिधी
तालुक्यातील वन विभागामार्फत शेळगाव ,हनुमंतवाडी  व तालुक्यात कांही ठिकाणी वन विभागाचे मोठे जंगल असून या जंगलामध्ये वन्य प्राण्यासाठी पानवटे बांधण्याचा मोठा गाजावाजा केलेला दिसून येत आहे पण शेळगाव येथे दहा वर्षापासून दोन पानवटे बांधले असून या पानवट्यामध्ये थेंबभरही पाणी नाही.
पानवटे नादुरुस्त असून या ठिकाणी जवळपास शंभर हेक्टरवर मोठ्या स्वरूपाचे वनक्षेत्र असून व तेथे मोठे जंगल असून त्या ठिकाणी अनेक प्रकारचे वन्य प्राणी हरीण, सायाळ, ससे, मोर, चीत्तर, रान मांजरे, लांडगे ,कोल्हे, व सरपटणारे प्राणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून यांचा वावर दिसून येत असून याकडे वन विभागाचे सतत दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. तसेच या ठिकाणी कुठल्याच प्रकारची शासकीय योजना राबवलेली दिसून येत नाही. जे काही राबत असेल ती कागदावरच असल्याचे परिसरातून बोलले जाते. एकेकाळी शेळगाव वनविभाग उस्मानाबाद विभागांमध्ये दुस-या क्रमांकाचे बक्षीस पटकावून अनेक प्रकारे सुविधा निर्माण केल्या होत्या पण आत्ता सध्याच्या स्थितीमध्ये या वनविभागाकडे अहमदपूर परिक्षेत्राचे दुर्लक्ष असल्याचे सतत दिसून येत आहे. यासाठी आम्ही येथील वन विभागाचे अधिका-यााशी फोनवरून बरेच वेळेस संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता २४ तास फोन एंगेज असल्याचे दिसून येते.
या विभागाच्या वनरक्षक यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही वन्यजीवांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याच्या तयारीत आहोत. अशा प्रकारची उत्तरे मिळतात ,तालुक्यामध्ये वन्यप्राण्यासाठी मोठ्या प्रमाणात वन विभागाने पानवटे तयार केल्याचे सांगितले जात आहे.मात्र हनुमंतवाडी असेल शेळगाव असेल हे वन विभागाचे नाहीत का असा प्रश्न लोकांना पडलेला दिसून यत आहेत .आता तरी वन विभागाच्या अधिका-यांना जाग येईल का व मुक्या प्राण्यासाठी पाण्याची व्यवस्था होईल का शेळगाव वनविभागामध्ये झालेल्या कामाची वन विभागामार्फत चौकशी केली जाईल का? अशा प्रकारचे प्रश्न शेळगाव परिसरातील जनतेकडून मांडले जात आहेत .या सर्व बाबीची चौकशी करून संबंधित अधिका-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल का ? अशी मागणी या परिसरातील वन्यजीव संघटनेमार्फत करण्यात येत आहे. दिरंगाईबाबत संबधितावर कारवाई न केल्यास वन्यजीव संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थांसोबत आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR