39.6 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रचित्रपट सुरू असतानाच सिनेमागृहात आग

चित्रपट सुरू असतानाच सिनेमागृहात आग

जालना : प्रतिनिधी
चित्रपट सुरू असतानाच सिनेमागृहात आग लागण्याची घटना जालन्यात घडली आहे. जालन्यातील ‘नीलम’ सिनेमागृहात हा प्रकार घडला. अचानक आग भडकल्याने संपूर्ण चित्रपटगृहात धूर पसरला.

त्यामुळे घाबरलेल्या प्रेक्षकांनी आपला जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरू केली. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा शो सुरू असताना ही घटना घडली. प्रेक्षक आपला जीव वाचवत सिनेमागृहाच्या बाहेर धावले.

जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर असलेल्या ‘नीलम’ टॉकीजमध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील चरित्रात्मक चित्रपटाचे शो सुरू आहेत. सोमवारी रात्रीचा शो सुरू असताना अचानक आग लागली. सिनेमागृहातील कुलरला आग लागल्याने थिएटरमध्ये मोठट्या प्रमाणात धूर पसरला. यामुळे प्रेक्षकांमध्ये भीती पसरली आणि ते सिनेमाहॉलच्या बाहेर धावले.

सिनेमागृह व्यवस्थापनाने आगीची घटना घडताच तात्काळ अग्निशमन दलास पाचारण केले आणि अर्ध्या तासात अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत सिनेमागृहाचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती सिनेमागृह मालकाने दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR